breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोरोना व्हायरसचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर परिणाम, बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता

नवी दिल्ली | महाईन्यूज |

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेशी दौऱ्यावरही कोरोना व्हायरसचा परिणाम होताना दिसत आहे. कोरोना व्हायरसमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 मार्चला असणारा बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता आहे. बांगलादेशमध्ये कोरोना व्हायरसचा एक रुग्ण आढळला आहे. त्यानंतर शेख हसिना सरकारने ढाका येथे होणारा मुजीबुर्रहमान जन्मशताब्दी उद्घाटन सोहळा साधेपणाने आणि छोट्या स्तरावर करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या घरी पार पडलेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याच्या बदलाविषयीची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. बांगलादेशमधील मुजीबुर्रहमान जन्मशताब्दी कार्यक्रमाच्या बदलाची माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये आली आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही. अधिकृत घोषणेनंतर निर्णय घेतला जाईल, असं पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे.

बांगलादेशमधील नागरिकांचा कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच ढाका येथील नॅशनल परेड ग्राऊंडवर होणाऱ्या मुजीबुर्रहमान जन्मशताब्दी भव्य उद्घाटन सोहळ्याऐवजी छोटा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेख मुजीबुर्रहमान यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि नेराळच्या राष्ट्रपती विद्या देवी यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button