breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

अमोल कोल्हेंच्या शिरूर लोकसभा मतदार संघावर ठाकरे गटाचा दावा?

पुणे : आगामी लोकसभा निवडणुक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीकडून निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. अमोल कोल्हे हे शिरूरचे खासदार आहेत. मात्र, शिवसेना ठाकरे गटाने या मतदारसंघावर दावा केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर म्हणाले, कार्यकर्त्यांची तशी भावना आहे. शिरूरमध्ये आम्ही या आधी लढलो होतो. लोकसभेत विद्यमान खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे आहेत. अमोल कोल्हे सध्या तिथले विद्यमान खासदार आहेत. परंतु तिथल्या आमच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहेत.

हेही वाचा – ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी-भाजपला २०२४ ची स्थिती अनुकूल नाही’; शरद पवारांचा दावा

पुण्यातील कसबा मतदारसंघात आम्ही काँग्रेसला मदत केली होती. मग यावेळी त्यांनी आमच्याबाबत विचार का करू नये? बाजूचा मतदारसंघ मावळमध्ये आमचा निवडून आलेला खासदार आहे. मी सांगितल्याप्रमाणे ही काही मागणी करण्यासाठी बैठक (ठाकरे गटाची बैठक) नाही. ही संघटनात्मक बैठक आहे. जिथे आपल्याकडे जिल्हा परिषदेचे चार सदस्यसुद्धा नाहीत तिथे लोकसभेच्या जागेची मागणी करायची हे योग्य नाही. तसं होता कामा नये, असं सचिन अहिर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button