breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी पुणे विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात

पुणे – शिक्षकेतर पदासाठी सातवा वेतन आयोग आंदोलन लागू करावा, पदोन्नतीमधील आरक्षणाची अंबलबजावणी करावी आणि अन्य मागण्यांसाठी पुणे विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज गुरुवारपासून आंदोलन सुरु करून जोरदार घोषणाबाजी दिल्या. या आंदोलनात 100 ते 150 जणांचा सहभाग आहे सध्या विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची तयारी सुरु आहे. असे असताना हे आंदोलन सुरु झाल्याने विद्यापीठाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने आयोजित बैठकीत शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली आणि हे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, लेखी निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याच्या भूमिकेवर कर्मचारी ठाम राहिले. याआधी विद्यापीठातील शिक्षकेतर.कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या राज्य सरकारकडे पोहोचवल्या होत्या. मात्र राज्य सरकारने त्यांची दाखल घेतली नाही. त्यामुळे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांमध्ये राज्य सरकारच्या या भूमिकेवरून नाराजी पसरली आहे. आज अखेर पुणे विद्यापीठ शिक्षकेतर सेवक कृती समितीच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button