breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘मोदी सरकारच्या योजना या लोककल्याणकारी’; दीपक मोढवे-पाटील

निगडीतील प्रभाग १३ मध्ये ‘गाव चलो अभियानास’ उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली यशस्वीपणे वाटचाल करणारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. त्याचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ होत आहे, अशा भावना भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दिपक मोढवे-पाटील यांनी व्यक्त केल्या.

पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये ‘गांव चलो अभियान’ सुरू आहे. त्याच माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहर भाजपा वाहतूक आघाडीच्या वतीने वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निगडीतील प्रभाग क्रमांक १३ मध्ये ‘गाव चलो अभियान’ राबवण्यात आले. यावेळी मोढवे पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या.

हेही वाचा – ‘रामकृष्ण मोरे यांच्या स्मृती आप्पा बारणे यांनी ताज्या ठेवल्या’; डॉ. सदानंद मोरे

मोदी सरकारच्या योजना या लोककल्याणकारी आहेत. या अभियानाच्या माध्यमातून होत असलेली जनजागृती हा एक स्तुत्य उपक्रम आहे, अशा भावना अनेकांनी भेटी दरम्यान व्यक्त केल्या. अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी नवमतदार, ज्येष्ठ कार्यकर्ते, समाजातील प्रतिभावंत व्यक्ती आदींची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला, अशीही माहिती दीपक मोढवे पाटील यांनी दिली. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे १० वर्षांतील प्रभावी कार्य, उत्तम संघटनात्मक बांधणी, जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती ‘गाव चलो अभियान’मधून लोकांपर्यंत पोहोचविण्यात आली.लाभार्थींची भेट घेत त्यांना मिळालेल्या योजनांची माहिती घेतली; तर केवायसी व इतर तांत्रिक कारणामुळे लाभ न घेऊ शकलेल्या नागरिकांनी त्याची पूर्तता करून योजनेंचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

” देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विविध विकास योजनांचा लाभ समाजातल्या अंत्योदय घटकापर्यंत पोहोचला. देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये पाचव्या क्रमांकावर आली आहे. विकसित राष्ट्र म्हणून भारताची जडणघडण होत असून जगातील सामर्थ्यवान देश म्हणून भारताचा देशवासीयांना अभिमान आहे.”

– दीपक मोढवे-पाटील, शहराध्यक्ष, वाहतूक आघाडी, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button