ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘देशाच्या विकासामध्ये गोरगरीब कष्टकरी रिक्षा चालकांचाही वाटा हवा’; बाबा कांबळे

रावेत येथे मुक्ताई माता रिक्षा स्टॅन्ड चे निलेश तरश यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी : भारत देशाचा सत्तातरावा स्वातंत्र्य महोत्सव आपण साजरा करत असून भारतीया च्या दृष्टीने आनंदाची घटना आहे. भारत देश सर्व आघाड्यांवरती प्रगती करत आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशातील बहुजन कष्टकरी शेतकरी घटकांनी मोठ्या प्रमाणे स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला.

जनतेच्या या सहभागामुळेच आंदोलन अधिक व्यापक झाले. देशाला स्वातंत्र्य मिळाले परंतु आज सर्वसामान्य गरीब घटक बहुजन मागासवर्गीय आदिवासी घटकांचे प्रश्न आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून देशाची संपत्ती काही ठराविक वर्गाकडे एक वाटले जात असून आर्थिक सामाजिक विषमता वाढत आहे. देशाच्या आर्थिक सामाजिक विकासामध्ये गोरगरीब कष्टकरी असंघटित कामगार वाहतूकदार रिक्षा चालकांचाही वाटा हवा असे मत महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा – प्युमेरिया ड्राईव्ह मधील नागरिकांचा रक्‍तदानाला प्रतिसाद

रावेत येथील मुक्ताई चौकामध्ये मुक्ताई माता रिक्षा स्टॅन्ड चे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते निलेश तरस व सुमित तरस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिक्षा चालक-मालकांना मार्गदर्शन करताना बाबा कांबळे यांनी हे मत व्यक्त केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश तरस, सुमित तरस, कष्टकरी कामगार पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे, महाराष्ट्राच्या पंचायत शहर उपाध्यक्ष अजित बराटे, माजी सैनिक ईसाक राज, कुरेशी समाजाचे अध्यक्ष जाफरभाई कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते रुपेश चांदणे, संजय बनपट्टे इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या संयोजनासाठी रिक्षा स्टँड अध्यक्ष अबू कलीमूर्ती, रवी बागडे, विरसेलवम सरियन, अनिल देशमुख, मुरुगवेल सुब्रमण्यम, गणेश स्वामी, विकास चव्हाण, मानदीप कुमार, विल्यम गौडर, राम कदम, यांनी परिश्रम घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button