पिंपरी / चिंचवड

शस्त्र बाळगल्या प्रकरणी सांगवी आणि भोसरीत चौघांना अटक

पिंपरी l प्रतिनिधी

शस्त्र बाळगल्या प्रकरणी सांगवी आणि भोसरी मध्ये चौघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून दोन पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे आणि एक कोयता अशी हत्यारे जप्त करण्यात आली आहे.

राजेश भिकू पडवळ (वय 26, रा. खडकवासला, पुणे), अतिश गोरख गायकवाड (वय 21, रा. ओटास्कीम निगडी), एनसन उर्फ तंबी एंथेनीपॉल जेवियर (वय 29, मामुर्डी देहूरोड) यांना पिंपळे गुरव, सांगवी येथून अटक करण्यात आली आहे.

दरोडा विरोधी पथकाला माहिती मिळाली कि, पिंपळे गुरव येथील एका हॉटेल समोरील पान टपरीवर तिघेजण संशयितपणे थांबले असून त्यांच्याकडे पिस्टल सारखे शस्त्र  आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस नाईक आशिष बनकर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

अतिश उर्फ बंट्या गोविंद गावडे (वय 21, रा. केशवनगर, कासारवाडी) याला कासारवाडी येथून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई तुषार वराडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कासारवाडी येथील आयटीआय शेजारील मैदानात आरोपी कोयता घेऊन आला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button