TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

विचित्रः पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात, ७ ते ८ वाहने एकमेकांवर आदळली

पिंपरी : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर विचित्र अपघात झाला आहे. महामार्गावर जवळपास साते ते आठ वाहने एकमेकांवर आदळली आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ४ जण जखमी झाले आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिटजवळ सात ते आठ वाहनांमध्ये अपघात झाला. या अपघातात एकमेकांवर आदळलेल्या वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. एका चारचाकी तर दुसऱ्या वाहनावर जाऊन पडल्याचे दिसत आहे.

या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चार जण जखमी झाले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. तसेच वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, या विचित्र अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सध्या जखमींना योग्य ती मदत करण्याचे काम सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button