एटीएम सेंटर मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या महिलेचे एटीएम बदलून 16 हजारांची फसवणूक
पिंपरी l प्रतिनिधी
एटीएम सेंटर मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या महिलेच्या मागोमाग जाऊन महिलेचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून 16 हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. हा प्रकार रविवारी (दि. `13) रात्री सात वाजता देहू आळंदी रोडवर एक्सिस बँकेच्या एटीएम सेंटर मध्ये घडली.
मयुरी गोविंद सूर्यवंशी (वय 22, रा. देहूगाव) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सूर्यवंशी रविवारी रात्री सात वाजताच्या सुमारास देहू-आळंदी रोडवरील देहूगाव बाजार येथे असलेल्या एक्सिस बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती एटीएम सेंटर मध्ये आले. त्यांनी फिर्यादी यांच्याकडील एटीएम कार्ड हातचलाखीने बदलले. त्यानंतर त्या एटीएम द्वारे 16 हजार रुपये काढून फिर्यादी यांची फसवणूक केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.