ताज्या घडामोडीराष्ट्रिय

पंजाबला नवे मुख्यमंत्री मिळणार; ६ आमदारांसह भगवंत मान बुधवारी शपथ घेणार

चंडीगढ | पंजाब विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आम आदमी पक्ष आता दिल्लीबाहेर आपले सरकार स्थापन करण्यास सज्ज आहे. पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून आपचे जुने आणि विश्वासू नेते भगवंत मान हे बुधवार, १६ मार्च रोजी शपथ घेणार आहेत. स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांच्या मूळगावी म्हणजेच खटकर कलान येथे हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या समारंभात आपचे ६ आमदारदेखील मंत्रिपदाची शपथ घेतील. या आमदारांत अमन अरोडा, हरपाल सिंग चीमा, कुलतार सिंग संधवा, हरजोत बैंस, बलजिंद्र कौर आणि कुंवर विजय प्रताप सिंग यांचा समावेश आहे. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित सर्वांना त्यांच्या पदाची शपथ देतील. या सोहळ्यासाठी स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांच्या मूळगावी सध्या जय्यत तयारी सुरू आहे.

भगवंत मान यांना लोक कॉमेडियन आणि नेते म्हणून ओळखतात. २०१४ मध्ये आम आदमी पक्षात प्रवेश केल्यापासूनच ते पक्षाचे स्टार प्रचारक राहिले आहेत. संपूर्ण पंजाबमध्ये प्रभाव असलेले २०२२च्या विधानसभा निवडणुकीत ते पक्षाचे एकमेव नेते आहेत. आम आदमी पक्षाची सर्वात मोठी ताकद आणि सर्वात मोठी कमकुवत बाजू म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. आम आदमी पक्षाचे पंजाबमधील सल्लागार आणि माजी पत्रकार मंजित सिंग सिद्धू हे भगवंत मान यांचे वर्गमित्र आहेत.

दरम्यान, ११७ सदस्यांच्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने बाजी मारत ९२ जागा जिंकल्या. पंजाबच्या राजकीय इतिहासातील आपने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला. हा विजयोसोत्सव साजरा करण्यासाठी आपने अमृतसरमध्ये विजयी मिरवणूक काढून राज्याच्या ३ कोटी जनतेचे आभार मानले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button