breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आगामी महापालिका निवडणुकीसाठी ‘रासप’ कार्यकर्त्यांची बैठक

पिंपरी / महाईन्यूज

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाची पिंपरी-चिंचवड कार्यकारणीची बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने व्युवरचना आखण्यात आली. त्यानुसार सर्वांनी कामाला लागण्याचे आदेश माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले यांनी कार्यकर्त्यांना दिले.

राष्ट्रीय समाज पक्ष पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले, कोकण विभाग प्रभारी अण्णासाहेब रुपनवर, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रभारी माऊली सलगर, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब सूर्यवंशी, पुणे जिल्हा प्रभारी रवींद्र चासकर, पुणे जिल्हा प्रभारी आप्पासाहेब सुतार, ज्येष्ठ नेते नाना गावडे, पिंपरी-चिंचवड शहर प्रसिद्धीप्रमुख प्रशांत कासले रेड्डी आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष भरत महानवर, युवक शहराध्यक्ष छत्रपती सांगोलकर, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष उमेश लोहार, वाहतूक आघाडी शहराध्यक्ष भाऊसाहेब हरणावळ, युवक संपर्क प्रमुख गणेश खरात, महिला आघाडी शहराध्यक्ष रोहिणी गंगावणे, शहर उपाध्यक्ष माऊली मोटे, महिला सरचिटणीस स्वाती सुके, महिला चिंचवड विधानसभा अध्यक्ष सुनिता सगर, शहर युवक उपाध्यक्ष अक्षय वायकुळे, भोसरी विधानसभा अध्यक्ष राजू धायगुडे, थेरगाव विभाग अध्यक्ष अंबादास तावडे, विनोद गायकवाड, अशोक ठोंबरे, वैजनाथ स्वामी, भारत मदने अशोक केळे, दिगंबर राजगे, विद्यासागर सुके आदी सदस्य आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अनेक कार्यकर्ते देखील बैठकीला उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button