breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

#Video: “आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढं पाणी पाहतोय”, शरद पवारांनी वाटलं आश्चर्य,

दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढलं. त्यामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचल्यानं मुंबईकरांना प्रचंड मनस्थाप सहन करावा लागाला. एवढच नाही तर अनेकजण पावसाचं पाणी साठल्यानं अनेकांना अडकून पडावं लागलं होत. मुंबईत प्रचंड पाऊस कोसळल्याने मंत्रालयासमोरही पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं. मंत्रालयासमोरील तुंबलेलं पाणी पाहून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही आश्चर्यचकीत झाले. आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढं पाणी पाहतोय, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली.त्यांचा हा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे.त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळेही आहेत.त्यांनीच हा व्हिडिओ काढला आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस असतानाही शरद पवार यांनी त्यांची नित्य कामे थांबवलेली नाहीत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, करोना परिस्थितीचा आढावा आदी कामे त्यांनी सुरूच ठेवली आहेत. काल संध्याकाळी मंत्रालयासमोरी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. बैठक संपल्यानंतर रात्री पवार आणि सुप्रिया सुळे हे घरी जायला निघाले. यावेळी पाऊस सुरू असल्याने सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून मुंबईतील पावसाचं लाइव्ह सुरू केलं. यशवंतराव चव्हाण सेंटरमधून पवारांची गाडी बाहेर पडून एअर इंडियाच्या दिशेने निघाली. यावेळी मंत्रालयासमोर प्रचंड पाणी साचले होते. पूरस्थिती झाली होती. त्यामुळे सुप्रिया सुळे या ड्रायव्हरला गाडी पाण्यातून बाहेर काढण्याबाबतच्या सूचना देत होत्या. मुंबईत अविश्वसनीय पाऊस पडलाय. मंत्रालयासमोर समुद्रच निर्माण झाल्यासारखं वाटतंय असही त्या म्हणाल्या.

त्यावर शरद पवारांनीही मंत्रालयासमोरील पूरपरिस्थितीवर आश्चर्य व्यक्त केलं. मंत्रालयासमोर एवढं पाणी कधीच भरत नाही. आयुष्यात पहिल्यांदाच एवढं पाणी पाहतोय, असं पवार म्हणाले. मात्र, मंत्रालय पार केल्यानंतर पुढे पाणी कमी होतं. त्यामुळे पवार सुखरूप घरी पोहोचले. दरम्यान, काल मुंबईत दिवसभरात ३२८.२८ मिमी पावसाची नोंद झाली. ऑगस्ट महिन्यात पडलेला आजवरचा हा सर्वात मोठा पाऊस आहे. गेल्या ४५ वर्षांत ऑगस्ट महिन्यात पडलेला हा विक्रमी पाऊस असल्याचं हवामान खात्याने सांगितलं. शिवाय काल मुंबईत ताशी ९० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते, असंही हवामान खात्याने सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button