breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

जेटचे वैमानिक आक्रमक; १ मेपासून विमान उड्डाण करणार नाही!

मुंबई: परदेशातील वैमानिक भारतीय वैमानिक व प्रवाशांना वाईट वागणूक देत असल्याच्या निषेधार्थ त्या वैमानिकांसह आम्ही १ मेपासून विमान उड्डाण करणार नाही, असा इशारा जेट एअरवेजमधील वैमानिकांच्या संघटनेने दिला आहे. या संघटनेने आपल्या सदस्यांना याबाबत आवाहन करणारे पत्रही पाठविले आहे. नॅशनल एव्हिएटर्स गिल्ड या संघटनेने सर्व वैमानिक सदस्यांना तसे निर्देश दिले आहेत.
आमच्या प्रवाशांची तसेच वैमानिकांची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची असून त्यांच्या बाबतीत जे प्रकार घडतात, ते अजिबात सहन केले जाणार नाहीत. परदेशातून आलेले वैमानिक हे आमच्या कंपनीवरही मोठा आर्थिक बोजा असून देशाच्या अर्थव्यवस्थेलाही भुर्दंडच आहेत, असे गिल्डने म्हटले आहे.

 गिल्डच्या तसेच जेटच्या वैमानिकांशी संपर्क केला असता त्यांनी अधिक काही बोलण्यास नकार दिला. मात्र गिल्डचे निर्देश प्राप्त झाले असून जेट एअरवेजलाच अधिक माहिती विचारा, असे त्यांनी सांगितले. जेट एअरवेजच्या ताफ्यात एकूण १७०० वैमानिक असून त्यात कमांडर श्रेणीचे सुमारे ८६० भारतीय व १०० परदेशी वैमानिक आहेत.
जेट एअरवेजने याविषयी सांगितले की, आम्ही सर्वांना समान संधी देत जात, धर्म, वर्ण, लिंग यामध्ये भेद न मानता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतो. आमच्याकडे १५ हजारांहून अधिक मनुष्यबळ असून हवाई वाहतूक क्षेत्रात आमच्या नोकरीस उमेदवार पसंती देतात. आमच्याकडे काही प्रमाणात परदेशातून आलेले वैमानिक आहेत. एक अव्वल दर्जाची कंपनी या नात्याने आम्ही सर्व वैमानिकांना समान संधी देतो व व्यवसायसंधीनुसार त्यांच्या नियुक्तीबाबतही योग्यरीत्या नियोजित असे धोरण अवलंबतो.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button