breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

करोनाच्या पार्श्वभूमीवर करसंकलन विभागाकडून ‘रेकॉर्डब्रेक’ वसूली

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महापालिका करसंकलन विभागाने फेब्रुवारी महिन्यात रेकॉर्डब्रेक कामगिरी करत तब्बल १२२ कोटी रुपयांचा भरणा पालिका तिजोरीत केली आहे. याशिवाय महापालिकेकडे नोंद नसलेल्या सुमारे ३५ हजार नविन मिळकतीचा शोध घेवून त्यांची नोंद करसंकलन विभागाकडे करण्यात आली, अशी माहिती उपायुक्त स्मिता झगडे यांनी दिली. दरम्यान, कोरोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर मिळकतकराची मोठी थकबाकी वसूल करण्याचे मोठे आव्हान होते. परंतू, करसंकलन विभागाने मिळकतकर वसुलीने महापालिका तिजोरीत मोठी भर पडली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत एकूण पाच लाख ३० हजार २७८ मालमत्ता आहेत. या मालमत्तांच्या करापोटी महापालिकेच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांची भर पडते. महापालिकेची जकात आणि एलबीटी बंद झाल्यावर उत्पन्नाचा मोठा स्रोत केवळ मिळकतकरावर राहिला आहे. शहरातील मालमत्तांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०१० मध्ये शहरात दोन लाख ८८ हजारांवर मालमत्ता होत्या. २०१५ मध्ये हीच संख्या चार लाख सात हजारांवर पोचली होती. ऑगस्ट २०२० च्या आकडेवारीनुसार शहरात पाच लाख ३० हजारांवर मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडून मिळकतकर वसूल करण्याचे मोठे आव्हान करसंकलन विभागाने पार पाडले आहे.

दरम्यान, करसंकलन विभागाने सध्यस्थितीत थकबाकी वसुलीकडे प्रामुख्याने लक्ष दिले आहे. पालिका प्रशासनाने नागरिकांनी कर भरण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या अनेक योजना राबवल्या आहेत. त्यात अभय योजनेचा महत्त्वाचा वाटा आहे. अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी मार्च अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. थकबाकी वसुलीसाठी या वर्षी वारंवार पाठपुरावा करावा लागला. मालमत्ता जप्तीचा आदेश काढावा लागला. त्यामुळे वसुली होत आहे. यात क्षेत्रिय अधिकाऱ्यांनीही प्रभागनिहाय कामगिरी चोख बजावली आहे. असेही झगडे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button