breaking-newsआंतरराष्टीय

यंदाचा जुलै सर्वाधिक उष्ण?

लांबाबत तातडीने कृती केली नाही तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. आता जे परिणाम दिसतात ते हिमनगाचे केवळ टोक आहे. आक्र्टिक  सागरातील बर्फ हे सर्वात नीचांकी पातळीवर असून युरोपात गेल्या महिन्यात उष्णतेची लाट होती. त्यात आक्र्टिक व ग्रीनलँडमध्ये १० ते १५ अंश सेल्सियस इतकी तापमानवाढ झाली. हवामानातील घातक बदल टाळणे हे जगण्यासाठी आवश्यक आहे. ही लढाई आपण जिंकली पाहिजे. त्यासाठी २१ सप्टेंबरला युवक हवामान बदल परिषद आयोजित करण्यात येत आहे. त्यात स्वीडिश हवामान कार्यकर्ती असलेल्या सोळा वर्षांच्या ग्रेटा थुनबर्ग हिचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत. केवळ भाषणे करून हा प्रश्न  संपणार नाही. त्यासाठी सरकारे, उद्योग आदींनी ठोस कृती करावी.

चिलीपासून फिनलंडपर्यंत, ब्रिटनपासून मार्शल बेटांपर्यंत कार्बन कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू असून इथिओपिया ते न्यूझीलंड, फिजी ते पाकिस्तान अशा सर्वच देशात लाखो झाडे लावण्याच्या योजना सुरू आहेत. त्यामुळे वातावरणातील कार्बन डायॉक्साईड कमी होईल, याच कारणाकरिता उद्योगांनीही तापमानवाढ रोखण्यासाठी १.३ लाख कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे.

-अँतोनियो गट्रेस, सरचिटणीस, संयुक्त राष्ट्रे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button