breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांचा ‘मास्टर स्ट्रोक’; स्थायी समिती सभापती निवडणुकीत ‘सांगली पॅटर्न’

  • पिंपरी-चिंचवडमधील सत्ताधारी भाजपाला धक्का देणार?
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सल्ल्याने मोठी रणनिती

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला धक्का देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी केली आहे. स्थायी समिती सभापती निवडणुकीत ‘सांगली पॅटर्न’ चा अवलंब करीत भाजपला शह देण्यात येणार आहे.

महापालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक शुक्रवारी, दि. ५ मार्च २०२१ रोजी होणार आहे. सत्ताधारी भाजपाकडून नगरसेवक ॲड. नितीन लांडगे यांनी, तर राष्ट्रवादी-शिवसेना अर्थात महाविकास आघाडीकडून नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

भाजपाकडून चिंचवड विधानसभेतील नगरसेवक शत्रुघ्न काटे, सुरेश भोईर, भोसरी विधानसभेतील रवि लांडगे आदी इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी भाजपाने नितीन लांडगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. परिणामी, रवि लांडगे यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नाराज सदस्यांचा फायदा घेत राष्ट्रवादी ‘सांगली पॅटर्न’ राबण्याच्या तयारी आहे. त्यासाठी शहरातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, प्रमुख पदाधिकारी यांच्या सोबत रणनिती आखली जात आहे. दोन दिवस शिल्लक असताना त्यासाठी राजकीय उलथापालथ करीत आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर हा विषय घातला आहे. आमचा प्रयत्न प्रामाणिक आहे, अशी माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी दिली.

अपक्ष सदस्य राष्ट्रवादीला मतदान करणार?

महापालिकेत अपक्ष आघाडीचे पाच नगरसेवक आहेत. त्यापैकी एक म्हणजे नगरसेविका निता पाडाळे यांना स्थायी समिती सदस्यपदी संधी मिळाली आहे. मात्र, सभापती निवडणुकीत पाडळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करण्यासाठी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील मनधरणी करीत आहेत. तसेच, रवि लांडगे यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिल्यामुळे भाजपाचे एक मत कमी होणार आहे, असा दावा शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी केला आहे. पण, भाजपाचे उमदेवार नितीन लांडगे यांच्या उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून निता पाडाळे यांची स्वाक्षरी आहे.

नाराज काटे, भोईर गळाला लागणार?

भाजपामधील नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि सुरेश भोईर स्थायी समिती सभापतीपदासाठी इच्छुक होते. मात्र, पक्षातील स्थानिक नेते आणि पक्षश्रेष्ठींनी त्यांना डावलले आहे. त्यामुळे नाराज झालेले काटे आणि भोईर राष्ट्रवादीच्या गळाला लावण्यासाठी शहराध्यक्ष वाघेरे-पाटील प्रयत्नशील आहेत. त्यामुळे भाजपाचे दोन्ही आमदार जगताप आणि लांडगे यांना शह देण्यात वाघेरे-पाटील यशस्वी होतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button