ताज्या घडामोडीमुंबई

राणे पिता-पुत्राला धक्का! दिशा सालियनप्रकरणी मालवणी पोलिस स्टेशनचे समन्स

मुंबई |  केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिशा सालियनबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी गुन्हा नोंदवल्यानंतर मालवणी पोलिस स्टेशनने राणे पिता-पुत्रांना समन्स बजावले आहे. ४ मार्चला सकाळी ११ वाजता त्यांना पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

दिशा सालियनची आई वसंती सालियन यांनी नारायण राणे आणि नितेश राणे आपली बदनामी करत असल्याचा आरोप करून त्यांच्या विरोधात मालवणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी या दोघांवर गुन्हा नोंदवला. त्यानंतर आता त्यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. दिशा सालियनने आत्महत्या केली नसून तिचा खून झाला आहे. तिच्यावर बलात्कार झाला होता, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे संतापलेल्या दिशाच्या पालकांनी महिला आयोग आणि मालवणी पोलिस ठाण्यास नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. आपल्या मुलीने आत्महत्या केली असताना आणि तिच्यासोबत कोणतेही गैरकृत्य झाले नसताना राणे पिता-पुत्रांनी केवळ राजकारणासाठी आपल्या मुलीची बदनामी केली असल्याचा आरोप दिशाच्या आई-वडिलांनी केला आहे. त्यावर मालवणी ठाण्याच्या पोलिसांनी गुन्हा नोंदवून राणे पिता-पुत्रांना समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्यानुसार ४ मार्चला सकाळी ११ वाजता त्यांना मालवणी पोलिस ठाण्यात हजर राहावे लागणार आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button