breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरोनाचं सावट दहीहंडीवरही ; यंदा दहीहंडीच रद्द

यंदा कोरोनामुळे सर्वच सणांवर गदा आली आहे. बकरी ईद , गणेशोत्सव आणि आता दहीहंडी देखील साजरी न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि भाजपचे आमदार राम कदम यांनी दहीहंडी उत्सव रद्द केल्याची घोषणा केलेली असतानाच आता मनसेनेही राज्यातील गोविंदा पथकांना यंदा दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचं आवाहन केलं आहे. मनसेचे नेते, माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी एक पत्रक काढून हे आवाहन केलं आहे.

राज्यात कोरोनाचं संकट असल्याने यंदा दहीहंडी उत्सव साजरा करू नका. दहीहंडी उत्सव साजरा न करण्याची संयमी भूमिका घेऊन कोरोनाला आळा घालूया, असं आवाहन मनसेने केलं आहे. यंदा हिरमोड झाला तरी पुढच्यावर्षी दणक्यात दहीहंडी उत्सव साजरा करू, असंही मनसेने म्हटलं आहे.

यंदा राज्यावर कोरोनाचं संकट असल्याने सर्वधर्मीयांनी सण-उत्सवाला उत्सवी रुप देणं टाळलं आहे. अनेकांनी घरातच सण साजरे करून राज्यशासनालाही कोरोना रोखण्यासाठी सहकार्य केलं आहे. या आधी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि भाजपचे आमदार राम कदम यांनी दहीहंडी उत्सव रद्द केल्याची घोषणा केलेली असतानाच आता मनसेनेही राज्यातील गोविंदा पथकांना यंदा दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचं आवाहन केलं आहे. मनसेचे नेते, माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी एक पत्रक काढून हे आवाहन केलं आहे.

यावर्षी संयमी भूमिका घेऊन करोना महामारीला आळा घालूया, असं आवाहन त्यांनी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक व महाराष्ट्रातील इतरही शहरात दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांना व समस्त महाराष्ट्रातील बालगोपाळाना केलं आहे. यंदा दहहंडी साजरी न करण्यासंदर्भात फोनद्वारे मुंबई ‘दहीहंडी समनव्य समितीतील’ अनेक सदस्यांशी बोलून त्यांचं मन वळवणार असल्याचंही नांदगावकर यांनी सांगितलं.

दरम्यान, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि मिरा-भाईंदरमध्ये एकूण ८०० ते ९०० गोविंदा पथके आहेत. या सर्व गोविंदा पथकांनी यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा आधीच निर्णय घेतला आहे. त्यातच मनसेनेही हे महत्त्वाचं आवाहन केल्याने यंदा राज्यात दहीहंडी उत्सव साजरा होणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button