breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईतील माझगाव परिसरात असलेल्या जीएसटी भवनला भीषण आग…

  • बैठक सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार घटनास्थळी दाखल…

मुंबईतील माझगाव परिसरात असलेल्या जीएसटी भवनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे . जीएसटी भवनच्या ८ व्या आणि ९ व्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

माझगाव येथील जीएसटी भवनच्या ८ व्या आणि ९ व्या मजल्यावर दुपारी १ च्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीची माहिती समजताच यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सुरु असलेली बैठक सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळावर बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button