breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि उद्धवजींचा विश्वास, मी आज भरुन पावलो : संजय पवार

मुंबई : कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक संजय पवार यांचं नाव राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी जाहीर करण्यात आलं आहे. खासदार संजय राऊत यांनी मोठ्या आनंदाने मावळ्याला संधी देत असल्याचं जाहीर केलं. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय पवार यांनी अत्यानंद व्यक्त केला. बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि उद्धवजींचा विश्वास, मी आज भरुन पावलो. माझा आनंद व्यक्त करण्याठी माझ्याजवळ शब्द नाहीयेत, अशी प्रतिक्रिया संजय पवार यांनी दिली.

राज्यसभेच्या सहाव्या जागेबाबत गेल्या दोन दिवसांपासून मोठा सस्पेन्स होता. संभाजीराजे शिवबंधन बांधणार की शिवसेना दुसरा उमेदवार जाहीर करणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र काल भल्या पहाटेच शिवसेनेची ऑफर धुडकावून संभाजीराजे कोल्हापूरला निघून गेले. कालच्या दिवसभरात सेनेच्या गोटात मोठ्या घडामोडी घडल्यानंतर संजय पवार यांचं नाव चर्चेत आलं. संजय पवार यांचं नाव चर्चेत आल्यानंतर संभाजीराजेंनी घाईघाईत सकाळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. उद्धवजींचं आणि आमचं ठरलंय, अशी मोजकी प्रतिक्रिया देत त्यांनी सस्पेन्स वाढवला खरा पण तोपर्यंत शिवसेनेने आपला पुढचा प्लॅन आखला होता. संजय पवार यांना सकाळीच मुंबईला येण्याचे आदेश दिले गेले होते. त्यानुसार सकाळीच संजय पवार मुंबईच्या दिशेने रवाना झाले. दुपारी ३ वाजता ते मुंबईत पोहोचले. शिवालय इथे जाऊन त्यांनी खासदार अनिल देसाई यांची भेट घेतली.

बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि उद्धवजींचा विश्वास असल्याने आज माझी उमेदवारी जाहीर झाली. मी खरंच भरुन पावलो. माणसाने फळाची अपेक्षा न करता काम करायला पाहिजे. चांगलं काम केलं की फळ मिळतंच, आज मला माझ्या कामाचं फळ मिळालं, असं मानतो. आता उमेदवारी जाहीर झाली आहे म्हटल्यावर निवडणुकीसंदर्भातील पुढची तयारी तर करावी लागेल. आता तयारीला लागलो आहे, शिवसेना पक्ष प्रमुखांनी ठरवलंय म्हटल्यावर मैदानात तर उतरलोय, असं संजय पवार म्हणाले.

ठरलं, मावळ्याला उमेदवारी द्यायची!

होय, संजय पवार यांचं नाव फायनल आहे. संजय पवार हा सेनेचा मावळा आहे. उद्धव ठाकरे यांनी संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलाय. पण अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, अशी माहिती संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

दोन्ही जागा शिवसेनच्या आहेत. दोन्ही जागांवर शिवसेना लढेल आणि दोन्ही जागांवर सेनेचे उमेदवार जिंकून येतील. कोल्हापुरचे संजय पवार गेली ३० वर्ष शिवसैनिक आहेत. कडवट सैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. पक्का मावळा आहे आणि मावळे असतात म्हणून राजे असतात, हे ही लक्षात घ्या… राजांना पक्षाचं वावडं असू नये, अशी महत्त्वपूर्ण कमेंट संजय राऊत यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button