breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडपुणेमनोरंजनमहाराष्ट्र

नवरात्रौत्सवानिमित्त एक्झर्बिया अबोड सोसायटी, जांभुळमध्ये रास-गरबा-दांडिया उत्साहात

मंडळाचे अध्यक्ष धनंजय वाणी, उपाध्यक्ष दीपक पाटील यांचे यशस्वी आयोजन

वडगांव (मावळ) । महाईन्यूज । गणेश क्षिरसागर ।

यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा करण्यात आला. भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले पहायला मिळाले. दोन वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे कोणतेच सार्वजनिक सणोत्सव साजरे करण्यात आलेले नव्हते. जांभुळगाव येथील एक्झर्बिया अबोड रहिवाशी संकुलामध्ये गणेशोत्सवानंतर नवरात्रौत्सवाचेदेखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध प्रकारच्या स्पर्धांचेदेखील आयोजन उत्साहात करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष धनंजय वाणी यांनी महाईन्यूजला दिली.

या कार्यक्रमासाठी साहिल एन्टरप्रायझेसचे विशाल गोडसे यांनी प्रायोजकत्व स्वीकारले. तर नवरात्रौत्सवासाठी , कृष्णा लोखंडे, दीपक पाटील, पंढरीनाथ हिंगे, सतिश कदम, सचिन कासार, सार्थक कुंभार आदींचे सहकार्य लाभले.

या नवरात्रौत्सवामध्ये प्रथमच रास-गरबा-दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरीक वेशभुषा स्पर्धा, उत्कृष्ट रास-गरबा, उत्कृष्ट दांडिया आदी स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धेमध्ये रचना कुंभार, प्रतिक्षा प्रक्षाले, अश्विनी गायकवाड आदी स्पर्धक विजेते ठरले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button