breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबई-पुण्यासह राज्यात ३ दिवस पावसाची शक्यता
मुंबई – येत्या दोन-तीन दिवसांत मुंबई, पुणे, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ९ जानेवारीपर्यंत पावसाची परिस्थिती कायम राहील आणि तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
वाचा :-औरंगाबादचं नाव संभाजीनगर झालं? CMO च्या ट्वीटमध्येच नामोल्लेख
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम तापमानावर झाला आहे. यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. हवामानात झालेल्या या बदलामुळे पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे.