breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबई पोलिसांचे माजी आयुक्त रामदेव त्यागींचे प्रदीर्घ आजाराने निधन
मुंबई: मुंबई पोलिसांचे माजी आयुक्त रामदेव त्यागी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झालेले आहे. ते 80 वर्षांचे होते. रिपोर्टनुसार, कॅन्सरग्रस्त त्यागी यांच्यावर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांच्यावर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीवर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.