breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विधायक उपक्रम : हिराबाई लांडगे यांच्या स्मरणार्थ मोफत रुग्णवाहिका लोकार्पण

सामाजिक कार्यकर्त्या शितल वर्णेकर यांचा पुढाकार

वाढदिनी जपली सामाजिक बांधिलकी अन् नेत्याप्रति निष्ठा

पिंपरी : सामाजिक- राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा मिळेल, असा आदर्श सामाजिक कार्यकर्त्या शितल वर्णेकर यांनी आपल्या कृतीतून घालून दिला आहे. आपल्या वाढदिनी सामाजिक बांधिलकी जप्त रुपीनगर- तळवडे परिसरातील नागरिकांसाठी रुग्णवाहिकचे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमाचे सर्वसामान्य नागरिकांमधून कौतूक होत आहे.
विशेष म्हणजे, भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री कै. सौ. हिराबाई लांडगे यांना देवाज्ञा झाली. या दु:खात सहभागी होत भाजपा महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्षा असलेल्या शितल वर्णेकर यांनी आपल्या वाढदिनी (दि.९ ऑक्टोबर) असलेले विविध कार्यक्रम रद्द केले. तसेच, ‘‘आईचे प्रेम अगणित आहे आईचे महत्व आपल्या जीवनामध्ये खूप आहे आपला आपला प्रत्येक दिवस आईमुळे असतो. आमदार लांडगे यांची आई माझ्या आई समान आहे. त्यांचे दु:ख हे माझे दु:ख आहे.’’ अशी भूमिका ठेवत कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम साजरा करणार नाही, असा संकल्प वर्णेकर यांनी केला आहे.
दरम्यान, कै. सौ. हिराबाई किसनराव लांडगे यांच्या स्मरणार्थ सामाजिक उपक्रमाअंतर्गत प्रभागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी नेहमीच गरज असलेली वैद्यकीय सेवा म्हणजेच मोफत रुग्णवाहिक सेवा लोकार्पण सोहळा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आला. त्यामुळे अनेक गरजू व्यक्तीसाठी सदर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध झाली आहे.
यावेळी आमदार महेश लांडगे, उद्योजक रोहिदास गाडे, माजी नगरसेवक शांताराम बापू भालेकर, माजी स्वीकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर, डॉ. धनंजय वर्णेकर, ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष एस. डी. भालेकर, उद्योजक गंगा भालेकर, युवा नेते शरद भालेकर, विशाल मानकरी, दादासाहेब नरळे, सर्जेराव कचरे, नितीन शिंदे, सुजाता काटे, अक्षय तांबे सुबोध साळवे, श्रेयस भालेकर, शिवाजी वायकुळे, भाऊसाहेब काळोखे, अभिजीत गिरी दिग्विजय सवई , हर्षल भंडारी, ज्ञानदीप शिक्षण प्रसारक संस्थेचे रमेश भालेकर, युवा नेते शिरीष उतेकर, दादा सातपुते, रामदास कुटे, अनिल भालेकर, सोमनाथ मेमाणे, सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव, कमलेश भालेकर, नीता शिंदे, शितल पारखी आदी उपस्थित होते.
वर्णेकर परिवाराचे समाजासाठी योगदान…
एच. डी. भालेकर म्हणाले की, खऱ्या अर्थाने समाजातील सर्व घटकाकरिता शितलताई यांचे कार्य मोठे आहे वर्णेकर परिवाराकडून नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे समाज हिताचे कार्य केले जाते वैद्यकीय सेवा हे एक फार मोठे काम आहे. कै.सौ हिराबाई किसनराव लांडगे यांच्या स्मरणार्थ समाजासाठी दिलेली रुग्णवाहिका म्हणजे आई करता दिलेली श्रद्धांजली आहे.

माझ्या प्रभागामध्ये अनेक सर्वसामान्य लोक राहतात रात्री अपरात्री वैद्यकीय सेवा मिळवणे खूप अवघड जाते. वेळेमध्ये दिलेली वैद्यकीय सेवा याला फार महत्त्व आहे. यासाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर व आई समान असलेल्या कै. हिराबाई लांडगे यांची आठवण कायम राहावी म्हणूनही मोफत रुग्णवाहिका सेवा आम्ही उपलब्ध करून देत आहे.

– शितल वर्णेकर,

उपाध्यक्षा, भाजपा, महिला आघाडी, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button