breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुणे विद्रुपीकरण केल्याने पुनीत बालन यांना सव्वा तीन कोटींचा दंड

पुणे : दहीहंडीच्या वेळी पुनीत बालन ग्रुप तसेच माणिकचंद ऑक्सिरीच यांच्याकडून मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात आली होती. पुणे महापालिकेकडून कोणतेही परवानगी घेण्यास उद्योगपती पुणे बालन यांनी दुर्लक्ष केल्याने महापालिकेने त्यांना तीन कोटी वीस लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

महानगरपालिका हद्दीमध्ये आकाशचिन्हे (स्काय माईन) व जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी नियम घालण्यात आले आहेत. त्यानुसार जाहिरात फलक उभारण्यासाठी पुणे महानगरपालिकेची रितसर पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. दहीहंडीच्या कालावधीमध्ये पुनीत बालन यांच्याकडून सार्वजनिक ठिकाणी ८x४ चौ. फुटाचे ऑक्सिरिच कंपनीचे अंदाजे २०००० अनधिकृत जाहिरात फलक कोणतीही पूर्वपरवानगी न घेता उभारून शहरात विदृपीकरण केल्याचे निदर्शनास आल्याचे संबंधित नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – पितृ पक्षात का केली जाते महालक्ष्मीची पूजा?

गणेश उत्सव वगळता सर्व जाहिरातींना शुल्क देय आहे. त्यानुसार सदर दहीहंडी कालावधीमध्ये अनधिकृत जाहिरात फलकांचे एकूण ८०,००० चौ. फुटांसाठी ३ कोटी २० लाख रुपये दंड भरण्यास बालन यांना सांगण्यात आले आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button