breaking-newsराष्ट्रिय

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 22 हजार 771 रुग्ण पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : भारतात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 22 हजार 771 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत, आज आलेली ही आकडेवारी आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. यामुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 6, लाख 48 हजार 315 वर पोहचली आहे. तर गेल्या 24 तासात देशात 442 रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे कोरोनापासून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा देखील वाढला आहे. आतापर्यंत देशात 3 लाख 94 हजार 226 लोक कोरोनामुक्त झाले असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. सद्यस्थितीला देशात 2 लाख 35 हजार 383 रुग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळं 18 हजार 655 जणांचा मृत्यू झाला आहे.दिलासादायक बाब म्हणजे कोरोनापासून बरे होण्याचे प्रमाण 60.80 टक्क्यांवर पोहचला असून मृत्युदर 4.52 टक्के आहेत. 

स्वास्थ्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आतापर्यंत 1 लाख 92 हजार 990 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू 1,02,721 रुग्ण, दिल्ली 94,695 रुग्ण, गुजरात 34,600 रुग्ण, उत्तर प्रदेश 25,797 रुग्ण, पश्चिम बंगाल 20,488 रुग्ण, आणि तेलंगाना 20,462 रुग्ण आढळून आले आहेत. याव्यतिरिक्त कर्नाटकमध्ये आतापर्यंत 19,710 रुग्ण, राजस्थान 19,052 रुग्ण, आंध्र प्रदेश 16,934 रुग्ण, हरियाणा 16,003 रुग्ण, आणि मध्यप्रदेशात 14,297 जणांना कोरोनाची लागण झाली आहेत. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button