breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बिगरनिवासी मिळकतधारकांनो थकबाकी भरा अन्यथा जप्ती अटळ

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिपंरी-चिंचवड महापालिकेकडून शहरातील बिगरनिवासी मिळकतींचे सव्हेक्षण करण्यात येत आहे. आजअखेर 18 हजार 600 बिगरनिवासी मिळकतींची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये 4 हजार 750 नवीन मिळकती आहेत. 900 वाढीव बांधकामांचा समावेश आहे. 360 वापरात बदल करण्यात आलेली बांधकामे आहेत, अशी एकूण 6 हजार 10 बांधकामे आढळून आली आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये 7 डिसेंबर अखेर बिगरनिवासी बांधकामांची सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांनी मिळकत सर्व्हेक्षणकामी करसंकलन विभागाला माहिती देऊन सहकार्य करावे. सर्व्हेक्षण कामकाजास विरोध केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वाढीव, नवीन, वापरात बदल अशा बांधकामांची माहिती कर संकलन विभागाला कळवावी. तसेच, नागरिकांना आकारणी न झालेल्या नवीन वाढीव अथवा वापरात बदल झालेल्या मिळकती निदर्शनास आल्यास त्यांनी 9890350662 या व्हॉट्सअप क्रमांकावर मिळकतीचे फोटो, पत्यासह पाठवावेत, असे आवाहन पालिकेने केले आहे.

मिळकत कराची रक्कम 5 लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मिळकतींवर लवकरच जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी मिळकतधारकांनी मिळकत कराची थकबाकी लवकरात लवकर भरावी, अन्यथा कारवाई अटळ असल्याचे आवाहन कर संकलन विभागाच्या सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button