breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री एकाच गाडीत, व्हिडीओ व्हायरल

मुंबई | महाराष्ट्रात तीन मोठे आणि अनेक छोट्या पक्षांनी महायुतीत एकत्र येत सरकार बनवलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला आहे. यानंतर विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षावर सातत्याने टीका केली जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकाच गाडीतील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा   –   एकाच ॲपमध्ये वापरता येणार दोन व्हाट्सॲप नंबर! या स्टेप्स फॉलो करा

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,मंत्री गिरीश महाजन आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे एकाच गाडीतून प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, जर केली नसती सुरत गुवाहाटी, तर कशाला झाली असती दाटीवाटी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button