MIT Arts, Commerce and Science Collegeमध्ये ‘तंत्रज्ञान तयारी व उत्पादन तयारी
शिक्षण विश्व: विकासाची दुहेरी किल्ली’ कार्यशाळा उत्साहात

पुणे : Eaton Research Labsच्या सहकार्याने एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथील इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल (IIC) व संशोधन व विकास (R&D) सेल यांच्या संयुक्त विद्यमाने “तंत्रज्ञान तयारी व उत्पादन तयारी : विकासाची दुहेरी किल्ली” या विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली.
महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये सकाळी १०.०० वाजता आयोजित या कार्यशाळेत नवोपक्रम विकासाची संपूर्ण प्रक्रिया, तंत्रज्ञान सज्जता स्तर (Technology Readiness Level – TRL) व उत्पादन सज्जता स्तर (Manufacturing Readiness Level – MRL) यांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रयोगशाळेत विकसित तंत्रज्ञानाच्या व्यावसायिकीकरणासाठी आवश्यक असलेल्या आयएसओ प्रमाणपत्र प्रक्रियेबाबतही माहिती देण्यात आली.
कार्यशाळेसाठी डॉ. सचिन वडिखाये (इनोव्हेशन मॅनेजर) प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी प्रयोगशाळेतील संशोधन उद्योगक्षेत्रात प्रभावीपणे रूपांतरित करण्याच्या पद्धती, तंत्रज्ञान हस्तांतरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी, तसेच उद्योग-संस्था सहकार्य यावर सखोल विवेचन केले. त्यांच्या संवादात्मक सत्राला विद्यार्थी व प्राध्यापकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हेही वाचा – राष्ट्रीय अस्मिता आणि समाजजागृतीचा दस्तऐवज; ‘हिंदू जागरणाच्या १०० वर्षांची संघर्षयात्रा’ प्रकाशित

महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. वाफारे यांनी मार्गदर्शन केले, तर उपसंचालक डॉ. अक्षदा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. वंदना पगार यांनी जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. डॉ. वैशाली खेरडेकर (अधिष्ठाता, संशोधन व विकास), तसेच IIC समन्वयक डॉ. संदीप धवळे आणि सर्व सदस्यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यशाळेला विविध शाखांतील विद्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण १३० सहभागी उपस्थित होते. नवोपक्रम, संशोधन आणि उद्योजकतेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेला हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ संशोधन पुरेसे नाही, तर त्या संशोधनाला उद्योगक्षम उत्पादनामध्ये रूपांतरित करण्याची तयारी तितकीच महत्त्वाची आहे. तंत्रज्ञान सज्जता स्तर (TRL) आणि उत्पादन सज्जता स्तर (MRL) यांची सखोल समज विद्यार्थ्यांना नवोपक्रमातून उद्योजकतेकडे वाटचाल करण्यासाठी सक्षम करते. अशा कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची दृष्टी, गुणवत्ता मानकांची जाणीव आणि उद्योगाशी प्रभावी संवाद साधण्याची क्षमता विकसित होते. महाविद्यालयाने संशोधन व नवोपक्रमाला चालना देण्यासाठी सातत्याने अशा उपक्रमांचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे.”
– डॉ. बी. बी. वाफारे, संचालक.




