T20 WC 2026 सेमीफायनलचं चित्र स्पष्ट; इंग्लंड व दक्षिण आफ्रिका अव्वल, उर्वरित दोन संघांवर नजर

T20 WC 2026 | टी-२० विश्वचषक २०२६ मधील सुपर-८ सामने अखेरच्या टप्प्यात पोहोचले असून सेमीफायनलचं चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. आतापर्यंत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांनी सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केलं आहे, तर उर्वरित दोन जागांसाठी भारत, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात चुरस आहे.
सुपर-८ फेरीत इंग्लंडने तिन्ही सामने जिंकत ६ गुणांसह गटात अव्वल स्थान मिळवलं. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका ४ गुणांसह आणि चांगल्या रनरेटमुळे पहिल्या स्थानावर कायम आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत. आता उर्वरित जागांसाठी निर्णायक सामने रंगणार आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना हा थेट नॉकआऊट ठरणार असून विजेता संघ सेमीफायनलमध्ये पोहोचेल. तर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातही चुरस आहे. पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्ध मोठा विजय आवश्यक आहे; अन्यथा न्यूझीलंडला संधी मिळू शकते. श्रीलंका आणि झिम्बाब्वे हे संघ स्पर्धेबाहेर गेले आहेत.
हेही वाचा : कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीबाबत लवकरच शासन निर्णय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सुपर-८ मधील दोन महत्त्वाचे सामने पुढीलप्रमाणे खेळवले जाणार आहेत. २८ फेब्रुवारीला पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (पल्लेकले) आणि १ मार्चला भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (ईडन गार्डन्स, कोलकाता). या सामन्यांनंतर सेमीफायनलचे चारही संघ निश्चित होतील. संभाव्य सेमीफायनल सामन्यांबाबतही चित्र स्पष्ट आहे. इंग्लंडचा सामना भारत किंवा वेस्ट इंडिज यांच्यातील विजेत्याविरुद्ध होणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा सामना पाकिस्तान किंवा न्यूझीलंड यांच्यापैकी एका संघाशी होईल.
सेमीफायनल वेळापत्रक:
-
४ मार्च २०२६ – इंग्लंड विरुद्ध भारत/वेस्ट इंडिज, मुंबई (वानखेडे)
-
५ मार्च २०२६ – दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान/न्यूझीलंड, कोलंबो/कोलकाता
अंतिम सामना ८ मार्च रोजी खेळवला जाणार असून क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.




