ताज्या घडामोडीपुणे

स्मार्टफोन लॉक करण्याचे अनेक पर्याय!

तुमचा स्मार्टफोन सुरक्षित आहे का ? जाणून घ्या

पुणे : आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन ही केवळ संवादाची साधन न राहता, आपली वैयक्तिक आणि आर्थिक माहिती साठवणारी उपकरणं बनली आहेत. त्यामुळे त्यांचं सुरक्षिततेनं लॉक करणं आवश्यकच आहे. यासाठी बाजारात चार प्रमुख पर्याय उपलब्ध आहेत ते म्हणजे फिंगरप्रिंट, फेस लॉक, पॅटर्न लॉक आणि पिन कोड.

1. फिंगरप्रिंट लॉक
फिंगरप्रिंट लॉक झपाट्याने फोन अनलॉक करतो. प्रत्येक व्यक्तीचा बोटाचा ठसा युनिक असल्यामुळे तो सुरक्षित मानला जातो. पण याचे काही तोटेही आहेत – जर कोणी झोपेत असताना तुमचं बोट फोनवर ठेवलं, तर लॉक उघडू शकतो. तसेच, ओलसर किंवा मळलेलं बोट असलं, तर फोन अनलॉक करण्यात अडचण येते.

2. फेस अनलॉक
फेस अनलॉक वापरणं अत्यंत सोयीचं वाटतं. पण बहुतांश स्मार्टफोनमध्ये 2D फेस रेकग्निशन असतं, जे कॅमेऱ्याच्या सहाय्याने चेहरा स्कॅन करतं – आणि कधीकधी फोटोवरूनसुद्धा फोन उघडू शकतो! iPhoneसारख्या प्रीमियम फोनमध्ये 3D फेस आयडी अधिक सुरक्षित असतो, पण तोही कमी प्रकाशात अचूक काम करत नाही.

हेही वाचा –  त्रिवेणीनगरमधील चौकांमध्ये दोन्ही बाजूंना ‘हाईट बॅरीगेट्स’

3. पॅटर्न लॉक
पॅटर्न लॉक लोकप्रिय आहे कारण तो वापरणं सोपं आहे. मात्र, स्क्रीनवर उरलेले बोटांचे ठसे आणि सहज ओळखता येणारे डिझाइन्समुळे तो फारसा सुरक्षित मानला जात नाही.

4. पिन कोड
पिन कोड हा आजही सर्वात विश्वासार्ह पर्याय मानला जातो. विशेषतः जर तुम्ही 8-अंकी PIN किंवा अल्फान्यूमेरिक पासवर्ड (जसे Gadar420@) वापरत असाल, तर तुमचा डेटा हॅक करणे जवळजवळ अशक्य होतं. पिन कोड कोणाच्या चेहऱ्यावरून, बोटावरून किंवा पॅटर्नवरून ओळखता येत नाही – म्हणून तो सर्वाधिक सुरक्षित!

 

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button