ताज्या घडामोडीपुणे

झटपट तयार होणारी व्हॅनिला आइसक्रीम रेसिपी,जाणून घेऊया …

फक्त 4 गोष्टी, आणि घरच्या घरी तयार करा मलईदार व्हॅनिला आइस्क्रीम

पुणे : एप्रिल सुरू होताच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे आणि हवामानातील बदलाची जाणीव सर्वांनाच होऊ लागली आहे. थंडीचा निरोप देत स्वेटर कपाटात गेले आहेत, तर हॉट ड्रिंक्सच्या जागी आता थंडगार आइस्क्रीमने एंट्री घेतली आहे. अशा वेळी थोडासा गारवा हवा असेल, तर तुमच्यासाठी एक दिलासा देणारी रेसिपी आम्ही घेऊन आलो आहोत ती म्हणजे घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने बनवता येणारी व्हॅनिला आइस्क्रीम रेसिपी, जी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. लॉकडाऊनच्या काळात सुरू झालेला ‘घरगुती आइसक्रीम’ ट्रेंड आता पुन्हा सुरु झाला आहे.

फूड व्लॉगर पारुल जैन यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली एक अत्यंत सोपी आणि झटपट तयार होणारी व्हॅनिला आइसक्रीम रेसिपी सध्या विशेष लोकप्रिय ठरतेय.

हेही वाचा –  त्रिवेणीनगरमधील चौकांमध्ये दोन्ही बाजूंना ‘हाईट बॅरीगेट्स’

या रेसिपीची खासियत म्हणजे, यात ना क्रीम लागते ना कंडेन्स्ड मिल्क! फक्त या चार घटकांच्या साहाय्याने अगदी सोप्या पद्धतीत घरच्या घरी आइस्क्रीम तयार करता येतं.

फुल क्रीम दूध कस्टर्ड पावडर साखर व्हॅनिला इसेंस

झटपट व्हॅनिला आइस्क्रीम रेसिपी बनवण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

1. मध्यम आचेवर एका भांड्यात फुल क्रीम दूध उकळायला ठेवा.

2. उकळणाऱ्या दुधातून ४-५ चमचे दूध एका छोट्या वाटीत काढून वेगळं ठेवा.

3. या वेगळ्या दुधात कस्टर्ड पावडर मिसळा आणि गाठी न होऊ देता नीट हलवा. टीप: कस्टर्ड पावडर नसेल, तर त्याऐवजी कॉर्नफ्लोर वापरू शकता.

4.उकळत्या दुधात साखर आणि तयार केलेलं कस्टर्डचं मिश्रण घालून सतत ढवळत राहा.

5. मिश्रण गारसर आणि थोडं घट्ट झालं की गॅस बंद करा.

6. मिश्रण थोडं थंड झाल्यावर त्यात व्हॅनिला एसेंस आणि मलई (cream) घालून सगळं एकत्र छान मिसळा.

7. तयार झालेलं मिश्रण एअरटाईट डब्यात ओता.

8. डब्याच्या वर एक प्लास्टिक शीट किंवा अॅल्युमिनियम फॉइल ठेवा आणि मग झाकण लावा.

9. डबा ३ तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवा.

10. ३ तासांनी मिश्रण बाहेर काढा आणि ब्लेंडरमध्ये एकदा ब्लेंड करा — यामुळे आइसक्रीम मऊ आणि मलईदार बनतं. नंतर पुन्हा डब्यात ओता आणि किमान ८ तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवा.

11. तयार झालेलं आइस्क्रीम नट्स, चॉकलेट सॉस किंवा आवडीनुसार सजवा आणि सर्व्ह करा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button