Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

म्युनिकमध्ये भारताचा डंका! ईशा सिंगने ४३ गुणांचा नवा जागतिक विक्रम रचत जिंकलं सुवर्णपदक

Esha Singh Wins Gold ISSF World Cup 2026 : भारताची स्टार नेमबाज ईशा सिंगने  आयएसएसएफ (ISSF) विश्वषक नेमबाजी स्पर्धेत इतिहास रचला आहे. महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात ईशाने केवळ सुवर्णपदक जिंकले नाही, तर तब्बल ४३ गुणांचा नवा विश्वविक्रम  प्रस्थापित केला आहे. या सुवर्ण कामगिरीसह ईशा सिंगने म्युनिक येथे सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताचे पदकांचे खाते उघडले आहे.

ऑलिम्पिक शूटिंग रेंजवर झालेल्या या अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात ईशा सिंगने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व राखले होते. तिने पहिल्या तीन मालिकांमध्ये अचूक नेम साधत ‘परफेक्ट स्कोर’ केला आणि इतर खेळाडूंवर मोठी आघाडी घेतली. अंतिम फेरीत ईशाने ४३ गुणांचा विश्वविक्रम करत यजमान जर्मनीच्या माजी जागतिक विजेत्या डोरीन वेनेकॅम्प हिला ५ गुणांच्या फरकाने पराभूत केले. जर्मनीच्या खेळाडूला रौप्य तर बल्गेरियाच्या मिरोस्लावा मिंचेव्हा हिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

हेही वाचा –  चुकीच्या ई-चलानविरोधात ऑनलाइन हरकत; पोलिसांना ४५ दिवसांत द्यावे लागणार उत्तर

ईशा सिंगने या कामगिरीसह दोन वर्षांपूर्वी बाकू येथे कोरियाच्या किम ये-जीने नोंदवलेला ४२ गुणांचा जागतिक विक्रम मोडीत काढला. तसेच तिने यांग जीनचा ४१ गुणांचा ज्युनियर विश्वविक्रमही मागे टाकला. विशेष म्हणजे, सध्याची ऑलिम्पिक चॅम्पियन यांग जीन या सामन्यात पाचव्या स्थानावर फेकली गेली.

यापूर्वी, पात्रता (क्वालिफिकेशन) फेरीत ईशाने प्रिसिजन राउंडमध्ये २९३ आणि रॅपिड फायर राउंडमध्ये २९४ असे एकूण ५८७ गुण मिळवून चौथ्या स्थानासह फायनल गाठली होती. भारताच्या इतर नेमबाज मनू भाकर (५८२ गुण) आणि राही सरनोबत (५८१ गुण) अनुक्रमे १२ व्या आणि १४ व्या स्थानावर राहिल्या.

ऐतिहासिक विजयानंतर ईशा म्हणाली, “म्युनिकमधील स्पर्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. येथे पिस्तूल प्रकारात अव्वल-८ मध्ये येणेही कठीण असते. अंतिम सामन्यात मी अजिबात शांत नव्हते, प्रचंड दबावामुळे माझा डावा हात कापत होता. पण नेमबाजीत तुम्हाला या दबावाचा सामना करावाच लागतो आणि अनुभवाचा खरा अर्थ हाच आहे.” तीन वेळा विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणाऱ्या ईशासाठी हे यश अत्यंत खास आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button