ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

त्याग आणि समर्पणाच्या भावनेची आठवण करून देणारा बकरी ईद सण पिंपरी चिंचवड शहरात उत्साहात साजरा

चिंचवड   :  बकरी ईद ( ईद-उल-अजहा)  इस्लाम धर्मात मोठा सण आहे. रमजान ईद नंतर साधारणपणे 70 दिवसांनी हा सण येतो . या सणाला बलिदानाचा सण म्हणूनही ओळखले जाते. याची सुरुवात प्रेषित इब्राहिम यांच्या अल्लाह वरील अपार श्रद्धेच्या कथेतून होते. प्रेषित इब्राहिम यांच्या अजोड त्यागाच्या आणि समर्पणाच्या भावनेची आठवण म्हणून जगभरातील मुस्लिम बांधव बकरी ईद साजरी करतात. बकरी ईदचा मुख्य संदेश हा सण केवळ कुर्बानी पुरताच मर्यादित नाही, तर तो स्वतःतील अहंकार , वाईट विचार आणि स्वार्थाचा त्याग  करण्याचा संदेश देतो. अल्लाहच्या इच्छेपुढे स्वतःच्या आवडी निवडी समर्पित करणे आणि समाजातील गरीब, गरजूंना आपल्या आनंदात सामावून घेणे ही या सणाची मूळ शिकवण आहे .

आज पिंपरी चिंचवड शहरात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम बांधव आज सकाळी नवीन कपडे परिधान करून सुवासिक तेल , अत्तर  कपड्याना लावून आपल्या मुलासमवेत परीसरातील जवळच्या मदरसा ,मसीद  , ईदगाह मैदानात एकत्र जमले . मौलानानी सकाळी पावणे सात ते साडेआठ दरम्यान विविध ठिकाणी   प्रवचन देवून  सामुदायिक नमाज पढविला .  ईद निमित्त पिंपरी चिंचवड शहर  पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहरातील विविध भागातील  मशीदी , ईदगाह मैदान , आदी ठिकाणी  भेट देऊन परिस्थितीचा आढावा  घेतला . मुस्लीम बाधवानी ईदच्या नमाज पठनानंतर एकमेकांना आलिंगन  देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. लहान मुले महिलांनी घरोघरी नमाज पठण केले . समाज बाधव , मित्र, नातेवाईकांनी  मुस्लीम बाधवाना  मोबाईल वरती ईदच्या शुभेच्छा दिल्या .

नेहरूनगर येथील पिंपरी चिंचवड मुस्लिम वेल्फेअर अँड कब्रस्तान ईदगाह कमीटीच्या वतीने  मुस्लिम बांधवांनी सामुदायीक नमाज पठण केले . अध्यक्ष जैन्नूदीन शेख , मुबीन बादशहा , मीरा साहब तरसगार, डॉ . बीलाल मुजावर  आदीनी संयोजन  केले .

हेही वाचा –  पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट… फडणवीसांनी काय केली मोठी मागणी? शेतकर्‍यांना काय होणार फायदा?

नेहरूगर येथील तवकल्ला जामा मशीदीत मौलाना अबूकलाम अशरदी यानी नमाज पढविला . संयोजन नजीर तरसगार , शकुर कुरेशी , मुनाफ तरसगार आदीनी केले .

चिंचवड स्टेशन येथील जामिया गौशिया मशिदीत मौलाना फैज अहमद फैज शेख यांनी नमाज पढविला. नमाज पटनानंतर मुस्लिम बांधवांनी ज्येष्ठ नेते व  आझम  पानसरे यांना ईदच्या  शुभेच्छा दिल्या. यावेळी मशिदीचे अध्यक्ष झिंशाग सय्यद, माजी नगरसेवक अस्लम शेख, निहाल पानसरे , सादिक पठाण नबीन पानसरे,  जफर सय्यद आदी उपस्थित होते.

चिंचवडगाव येथील जमातुल मुस्लेमिन शाही ईदगाह मैदानावर मौल्लाना मिनाज उद्दीन व मौल्लाना कमरूल  यांनी नमाज पढविला . यावेळी  आलमगीर शाही मशिदीच्या वतीने अध्यक्ष इमरान पानसरे, अख्तर पिंजारी , सहाय्यकआदींनी पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस विभागाचे डी. सी.पी. संदीप आटोळे , सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक  रणजीत जाधव याचा मुस्लीम बांधवाच्या वतीने सत्कार करण्यात आला .  चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष  गुलामअली भालदार यानी मुस्लीम बांधवाना ईदच्या शुभेच्छा दिल्या .

संत तुकाराम नगर येथील सामाजिक कार्यकर्ते शकरूल्ला पठाण यांनी ईद निमित्त पिंपरी येथील सावली निवारा केंद्रातील  निराधार,  वंचित, ज्येष्ठ नागरिकांना फळे वाटप केले .

पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी समुदायीक नमाज पठण झाले .खराळवाडी येथे जमाते-मुस्लिम मसीद ,नेहरूनगर येथे नूरानी मसीद ,संत तुकाराम नगर महंमदिया मसीद ,वल्लभनगर – मजीद ए इमरान, नेहरूनगर – हजरत बिलाल,रूपी नगर – मदीना मसीद , गांधीनगर , पिपरी – जी .एन. कॉलनी , कासारवाडी – जामा मसीद , पिंपळे गुरव – मदीना मसीद , चिंचवड स्टेशन दवा बझार – मसीद ए अम्मार , निगडी – नुरानी मजीद , आकुर्डी – मदीना  मसीद व अन्यत्र ठिकाणी मौलानानी नमाज पढविला .

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button