ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

पिंपरीतील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची ऐतिहासिक कामगिरी

पुण्यात पहिली 'रोबोटिक-आसिस्टेड' हृदय शस्त्रक्रिया यशस्वी

पिंपरी | पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रात एक मोठी आणि अभिमानास्पद कामगिरी झाली आहे. पिंपरी येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने पुण्यात पहिली अत्याधुनिक रोबोटिक पद्धतीने हृदयाच्या झडपेची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. पारंपारिक ओपन-हार्ट सर्जरीला (Open-Heart Surgery) हा एक सुरक्षित, जलद आणि आधुनिक पर्याय ठरला आहे.

पिंपरी-चिंचवड येथील एका ४६ वर्षीय महिलेला ‘रुमॅटिक हार्ट डिसीज’ (Rheumatic Heart Disease – RHD) म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर हृदयाच्या झडपांना (व्हॉल्व्हला) होणारा आजार झाला होता, ज्यामुळे त्यांच्या हृदयाचा मिट्रल व्हॉल्व्ह म्हणजे ‘रक्तप्रवाह नियंत्रित करणारा पडदा खराब झाला होता. हा व्हॉल्व्ह बदलण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज होती.

पारंपारिक पद्धतीनुसार, अशा शस्त्रक्रियेसाठी छातीचे हाड (Breastbone) मधोमध कापून ‘ओपन-हार्ट सर्जरी’ करावी लागते. यामध्ये रुग्णाला खूप जास्त वेदना होतात, बरे होण्यास अनेक महिने लागतात आणि छातीवर मोठी जखम (डाग) राहते.

पारंपारिक पद्धतीला फाटा देत डीपीयूच्या डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला. यामध्ये छातीचे मुख्य हाड न कापता, बरगड्यांच्या मधून लहान छिद्र पाडून ही शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षितपणे पार पाडण्यात आली. हाडांना कोणतीही इजा न झाल्यामुळे पारंपारिक ओपन-हार्ट सर्जरीच्या तुलनेत रुग्णाचा त्रास आणि वेदना खूपच कमी झाल्या. या आधुनिक उपचार पद्धतीमुळे रुग्णामध्ये अतिशय जलद सुधारणा झाली आणि ती अवघ्या काही दिवसांतच स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभी राहिली.

या शस्त्रक्रियेनंतर छातीवर कोणताही मोठा किंवा विद्रूप डाग राहिला नाही, एकंदरीत, कमीत कमी त्रासाच्या या सुरक्षित उपचारामुळे रुग्ण अवघ्या अवघ्या दोन आठवड्यांतच आपल्या नेहमीच्या कामावर परतणे सहज शक्य झाले.

हेही वाचा

“मी माझा शब्द पाळला…”; मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना सिद्धरामय्या भावुक

“डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदय शस्त्रक्रिया विभागातील तज्ज्ञ शल्यचिकित्सक डॉ. आशिष बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात पहिली ऐतिहासिक रोबोटिक हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. भूलतज्ज्ञ डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. वेणूराज वारके आणि यांच्या बहुविभागीय तज्ज्ञ टीमने यशस्वीरीत्या ही शस्त्रक्रिया पूर्ण केली.

या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती अतिशय वेगाने सुधारली. शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी रुग्ण स्वतःहून चालण्या-बोलण्यास आणि दैनंदिन हालचाली करण्यास सक्षम झाला. तिसऱ्या दिवशी रुग्णाने हॉस्पिटलच्या जिममधील पुनर्वसन (Rehabilitation) सुविधेतही सहभाग घेतला. महिन्यांऐवजी अवघ्या काही दिवसांतच रुग्ण पूर्णपणे निरोगी व्यक्तीसारखा धावपळ करू लागला.

या यशाबद्दल बोलताना डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रसिद्ध हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी शल्यचिकित्सक डॉ. आशिष बाविस्कर म्हणाले, “भविष्यात हृदय शस्त्रक्रिया याच पद्धतीने केल्या जातील. रोबोटिक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आता हृदय शस्त्रक्रियेचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. या पद्धतीमुळे अत्यंत बारकाईने आणि अचूकपणे काम करता येते. रुग्णाच्या शरीरावर कमीत कमी जखमा होतात, ज्यामुळे तो वेगाने बरा होतो आणि लवकर घरी जाऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रुग्णाला त्याच्या नेहमीच्या दिनक्रमात लवकर परतणे सोपे होते. जी शस्त्रक्रिया पूर्वी खूप अवघड आणि कठीण वाटायची, ती आता आपण अधिक सुरक्षितपणे, खात्रीशीरपणे आणि अचूकपणे करू शकत आहोत.”

“पुण्यातील पहिली अत्याधुनिक रोबोटिक पद्धतीने करण्यात आलेली हृदयाच्या झडपेची शस्त्रक्रिया यशस्वी करणे हा आमच्यासाठी एक अभिमानाचा टप्पा आहे. डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने नेहमीच अत्याधुनिक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि वैद्यकीय उत्कृष्टतेचा मेळ घालून रुग्णांना सुरक्षित आणि जागतिक दर्जाचे उपचार देण्यासाठी कटिबद्ध आहे.”

– डॉ. पी. डी. पाटील, कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे.

“हा टप्पा आमच्या रुग्णांना जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या ध्येयाची साक्ष देतो. आम्ही हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण, ECMO अशा सर्व प्रगत कार्डिओ-थोरॅसिक शस्त्रक्रिया करत आहोत. आता रोबोटिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांच्या सेवेचा दर्जा आणखी उंचावला आहे.”

– डॉ. सौ. भाग्यश्री पी. पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button