breaking-newsताज्या घडामोडीपुणे

गणरायाच्या आगमनासाठी आता पुण्यनगरी सज्ज, जाणून घ्या मानाचे गणपती आणि त्यांचे अनोखे देखावे

पुणे :  गणरायाच्या आगमनासाठी आता पुण्यनगरी सज्ज झालीय. उद्या गणेश चतुर्थी निमित्त घरगुती गणपतीसह सार्वजनिक गणेश मंडळ लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी तयार आहेत. पुण्यातील गणेशोत्सवाचा बाबतीत म्हणायचं तर मानाचे पाच गणपती आणि इतर प्रमुख गणेश मंडळांची गेल्या अनेक वर्षांपासून वैभवशाली परंपरा. ही परंपरा यावर्षी सुद्धा जपण्यात आलेली आहे. यावर्षी देखील या सार्वजनिक मंडळांकडून आकर्षक देखावे आणि बाप्पाच्या स्वागतासाठी तयारी पूर्ण केलीय. पाहूया पुण्यातील मानाच्या गणपती आणि इतर प्रमुख मंडळांच्या यावर्षी सादर केलेले देखावे आणि वैशिष्ट्ये…

मानाचा पहिला गणपती: पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती

देखावा: श्री सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक

प्राणप्रतिष्ठा:11 वाजून 37 मिनिटे

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: प्रभात बँड, संघर्ष ढोल पथक, शौर्य ढोल ताशा पथक, श्रीराम पथक

मानाचा दुसरा गणपती: तांबडी जोगेश्वरी

देखावा: स्वानंद निवास

प्राणप्रतिष्ठा: दुपारी 12 वाजून 11 मिनिटे

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: न्यू गंधर्व ब्रास बँड, शिवमुद्रा ढोल ताशा पथक, ताल पथक, विष्णूनाद शंख पथक

मानाचा तिसरा गणपती: गुरुजी तालीम मंडळ

देखावा: गजमहाल

प्राणप्रतिष्ठा: दुपारी 1 वाजून 31 मिनिटे

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्वराज ब्रास बँड, गुरुजी प्रतिष्ठान ढोल ताशा पथक, रुद्रांग ढोल ताशा पथक , आवर्तन ढोल ताशा पथक

मानाचा चौथा गणपती: तुळशीबाग गणपती उत्सव मंडळ

देखावा: ओडिशा येथील श्री जगन्नाथ मंदिर

प्राणप्रतिष्ठा: दुपारी 12.30 वाजता

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: लोणकर बंधूचा नगारा, शिवगर्जना ढोल पथक आणि विघ्नहर्ता ढोल ताशा पथक

मानाचा पाचवा गणपती: केसरीवाडा गणपती

देखावा: ऐतिहासिक केसरीवाड्यात बाप्पा विराजमान होणार

प्राणप्रतिष्ठा: सकाळी 11 वाजता

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: पालखी मधून श्रींची मिरवणूक काढली जाईल. यावेळी श्रीराम ढोल ताशा पथक आणि गंधाक्ष पथक यांचे वादन

हेही वाचा    –    मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांचं सूचक वक्तव्य; म्हणाले..

पुण्यातील इतर प्रमुख गणेश मंडळ

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

देखावा: हिमाचल प्रदेश मधील जटोली शिवमंदिर

प्राणप्रतिष्ठा: 11 वाजून 11 मिनिटे

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: फुलांच्या सिंह रथातून मिरवणुकीला देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधूंची सनई, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड आणि गंधाक्ष ढोल-ताशा

अखिल मंडई मंडळ

देखावा: पुरातन काळातील “शिवालय”

प्राणप्रतिष्ठा: दुपारी 12 वाजता

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: त्रिशूळ रथातून बाप्पाचे स्वागत. मिरवणुकीच्या अग्रभागी न्यू गंधर्व बॅन्ड पथक, स्वराज्य, सामर्थ्य ढोल पथक यांचे वादन

हुतात्मा बाबू गेनु मंडळ

देखावा: मदुराई येथील मीनाक्षी मंदिर

प्राणप्रतिष्ठा: दुपारी 12.30 वाजता

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: गजांत लक्ष्मी रथातून बाप्पाच्या स्वागतासाठी रूद्र गर्जना, नु. म. वी, मोरया व शिव प्रताप ढोल पथक सज्ज

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button