ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपुणे

प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे ‘पोश’ (POSH) विषयावरील जनजागृती प्रशिक्षण संपन्न

मोशी, पुणे : प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण कायदा (POSH Act, 2013) या विषयावरील विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन विधिज्ञ व POSH तज्ज्ञ ॲड. गीतांजली कडाते यांनी केले.

कार्यस्थळी सुरक्षित, सन्मानजनक व सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या प्रशिक्षणामध्ये POSH कायद्याच्या प्रमुख तरतुदी, लैंगिक छळाची व्याख्या, तक्रार निवारण प्रक्रिया, अंतर्गत तक्रार समितीची (Internal Committee) भूमिका तसेच कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

हेही वाचा –  मला दिलेली जबाबदारी मी पूर्ण केली, मुख्य रणनीतीकार देवेंद्र फडणवीसच, नितेश राणे यांनी म्हटले..

ॲड. कडाते यांनी विविध उदाहरणे, केस स्टडी आणि संवादात्मक चर्चेच्या माध्यमातून विषय सोप्या व प्रभावी पद्धतीने समजावून सांगितला. सहभागी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रशिक्षणातून महत्त्वपूर्ण ज्ञान प्राप्त केले.

विद्यालय व्यवस्थापनाने ॲड. गीतांजली कडाते यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या प्रशिक्षणामुळे कार्यस्थळी परस्पर आदर, संवेदनशीलता व सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली.

प्रियदर्शनी स्कूल, मोशी हे संस्थेच्या सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, समावेशक व प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे उपयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम सातत्याने आयोजित करीत असते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button