मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांचं सूचक वक्तव्य; म्हणाले..
मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी आरोप प्रत्यारोस सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांचं विधान महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात महत्वाचं मानलं जात आहे.
महायुतीत कोण मुख्यमंत्री होणार यावर अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री पदावर कोण निर्णय घ्यायचं ते नंतर ठरवण्यात येईल. महत्वाचं म्हणजे महायुतीचं बहुमत मिळवणं. बहुमत मिळाल्यावर आम्ही यावर निर्णय घेऊ. मुख्यमंत्री कोणत्या पक्षातू होईल हे निवडणूक निकालानंतर ठरवणार आहे.
हेही वाचा – एकट्या महाराष्ट्रात ५२.४६% परकीय गुंतवणूक; देवेंद्र फडणवीस यांची माहिती
महायुतीतील जागावाटपाबाबत अजित पवारांनी सांगितलं की, तीनही पक्षाच्या नेत्यांची चर्चा होईल आणि त्या आधारे प्रत्येक पक्षाची ताकद बघून जागा वाटप केलं जाईल. २०१९ च्या निवडणुकीत आम्ही ५६ जागा जिंकलो होतो, तसेच आमच्याकडे ६-७ अपक्ष आमदारही आहेत. त्यामुळे यावेळी ६० जागांसाठी लढण्याचा आमचा मानस आहे. जागावाटप हा निवडणूक योग्यता आणि पक्षाच्या स्थानिक ताकदीवर आधारित असेल, असं अजित पवारांनी सांगितलं.