ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आकुर्डी येथील प्रा. अवधुत कुलकर्णी यांना स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पीएच.डी. पदवी

डॉ. डी वाय पाटील शैक्षणिक संकुलात भव्य सत्कार सोहळा संपन्न..!

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल अंतर्गत कार्यरत डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. अवधुत कुलकर्णी यांना स्थापत्य अभियांत्रिकी या शाखेमध्ये पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. ही पदवी संदीप विद्यापीठ, नाशिक तर्फे देण्यात आली.

प्रा. कुलकर्णी यांच्या संशोधनाचे शीर्षक “शहरी रस्त्यांवरील इलेक्ट्रिक बसच्या रिअल-टाइम ड्रायव्हिंग सायकलच्या परिणामाचे विश्लेषण” (Impact Analysis of Real-time Driving Cycle of Electric Bus on Urban Roads) असे आहे. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत इलेक्ट्रिक बसचा वापर वाढत असून, त्याचा शहरी रस्त्यांवरील वाहतूक, ऊर्जा कार्यक्षमता व पर्यावरणीय परिणाम यांचा सखोल अभ्यास या संशोधनात करण्यात आला आहे. हे संशोधन भविष्यातील शाश्वत आणि पर्यावरणपूरक वाहतूक नियोजनासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

हेही वाचा –  प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे ‘पोश’ (POSH) विषयावरील जनजागृती प्रशिक्षण संपन्न

या संशोधन कार्यासाठी त्यांना कुलगुरु प्रा. डॉ. अरुण कुमार द्विवेदी तसेच नगर नियोजक डॉ. तुषार बागुल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ. डी वाय पाटील शैक्षणिक संकुलात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संकुलाचे चेअरमन सतेज पाटील, संस्थेचे विश्वस्त तेजस पाटील, संकुलाचे संचालक रियर ऍडमिरल अमित विक्रम (निवृत्त), महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पी. मालती, स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. अशोक मोरे, महाविद्यालयाचे कुलसचिव प्रशांत भालेराव तसेच सर्व प्राध्यापक व सहकारी वर्ग उपस्थित होते.

सर्व मान्यवरांनी प्रा. अवधुत कुलकर्णी यांच्या शैक्षणिक यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रा. कुलकर्णी यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर पडली असून, संशोधन क्षेत्रात संस्थेची प्रतिमा अधिक बळकट झाली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“पीएच.डी. शिक्षणाच्या माध्यमातून येत्या काळात शहरी वाहतूक आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात माझे संशोधन धोरणकर्ते, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अभियंते यांना उपयुक्त ठरावा, असा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. भविष्यातील पिढीसाठी सुरक्षित, शाश्वत आणि स्मार्ट शहरे घडवण्यासाठी शिक्षण, संशोधन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यांची सांगड घालणे हेच माझे ध्येय आहे.”

– प्रा. अवधूत कुलकर्णी, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button