‘पुणे साहसी क्रीडांची राजधानी’; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे : पुणे साहसी क्रीडांची राजधानी बनली आहे. २० एव्हरेस्टवीर पुण्यात आहेत, त्यापैकी १४ गिरिप्रेमी आणि जीजीआयएमशी संबंधित आहेत. मी या प्रवासाचा भाग असण्याचा अभिमान बाळगतो आणि जीजीआयएमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो, प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.
गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगच्या (जीजीआयएम) दहाव्या वर्धापनदिन सोहळ्यात मोहोळ बोलत होते.
हेही वाचा : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना २ वर्षांचा कारावास, मंत्रीपद धोक्यात?
प्रमुख पाहुणे मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद चौधरी, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, निवृत्त ब्रिगेडियर अशोक अॅबे, नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगचे प्राचार्य कर्नल अंशुमान भदौरिया, जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगचे प्राचार्य कर्नल हेमचंद्र सिंग, विंग कमांडर देविदत्ता पंडा, उद्योगपती जगदीश कदम, जीजीआयएमचे संस्थापक संचालक उमेश झिरपे, क्यूबिक्स मायक्रोसिस्टिम्सचे संचालक विजय जोशी, मनीष साबडे, गिरीजाशंकर मुंगली, आनंद पाळंदे, उषःप्रभा पागे, जयंत तुळपुळे, केशब पौडियाल, खेमराज ठाकूर, चंदन शर्मा उपस्थित होते. यावेळी विवेक फणसळकर आणि अशोक अॅबी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आयोजीत चर्चासत्रात मान्यवरांनी अनुभव व्यक्त केले.
यावेळी माउंटेनिअरिंग हँडबुकचे प्रकाशन झाले. अव्हान निर्माण उडान (एएनयू), डिप्लोमा इन माउंटेनिअरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स आणि इतर प्रशिक्षणांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रमुख एव्हरेस्टवीर अशिष माने, जितेंद्र गवारे, कृष्ण ढोकेले, प्रसाद जोशी आणि आनंद माळी आदी गिर्यारोहक उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. अमित त्रिभुवन यांनी केले तर भूषण हर्षे यांनी आभार मानले.