ताज्या घडामोडीपुणे

प्रथिनांसाठी मखाना उत्तम पर्याय

जर तुम्हाला तुमचे स्नॅक्स प्रथिनेयुक्त बनवायचे असतील तर मखाना आणि शेंगदाणे एकत्र भाजून खा.

पुणे : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तंदुरुस्त राहणे आणि निरोगी राहणे हे एक आव्हान बनले आहे. तसेच या बदलत्या वातावरणात स्वतःला फिट ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे. कारण तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी पोषक तत्वांनी समृद्ध आहार घेणे खूप महत्वाचे आहे. प्रथिने हे शरीरासाठी सर्वात महत्वाचे पोषक घटकांपैकी एक आहे, जे स्नायूंना मजबूत देण्यास व हाडांचे आरोग्य सुधारण्यास आणि शरीरात ऊर्जा राखण्यास मदत करतात. मात्र बऱ्याचदा आपण आपल्या आहारात योग्य प्रमाणात प्रथिनांचा समावेश करौ शकत नाही, ज्यामुळे शरीरात त्याची कमतरता निर्माण होते.

तुम्हालाही प्रथिनांच्या कमतरतेवर मत करायची असल्यास तुमच्या डाएटमध्ये मखान्याचा समावेश करा. प्रथिनांसाठी मखाना उत्तम पर्याय असू शकतो. मखान्यामध्ये भरपूर प्रथिने, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. पण तुम्हाला माहिती आहे का की जर मखाना काही खास गोष्टींसोबत मिसळून खाल्ला तर त्याचे पोषण आणखी वाढते? प्रथिनांची कमतरता दूर करण्यासाठी मखान्यासोबत कोणते पदार्थ खाऊ शकतात ते जाणून घेऊया.

हेही वाचा –  पिंपरी-चिंचवड अन् भोवतालच्या पाच किलोमीटर परिसरातील शेकडो गृहप्रकल्प अडचणीत

मखानासोबत शेंगदाण्याचे सेवन
जर तुम्हाला तुमचे स्नॅक्स प्रथिनेयुक्त बनवायचे असतील तर मखाना आणि शेंगदाणे एकत्र भाजून खा. शेंगदाण्यामध्ये प्रथिने आणि हेल्दी फॅटचे प्रमाण चांगले असते, जे शरीराला ऊर्जा प्रदान करतात तसेच स्नायूंना बळकटी देतात.

मखान्यासह दहीचे सेवन
दही हे प्रथिनांचा एक उत्तम स्रोत मानले जाते. जर तुम्ही दह्यामध्ये मखाना मिक्स करून खाल्ले तर ते केवळ पचनास मदत करत नाही तर चयापचय गतिमान करते. त्याशिवाय त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर ठरते.

दुधासोबत मखाना खा
रात्री झोपण्यापूर्वी दुधासोबत तुम्ही जर मखाना खाल्ल्यास तुमची हाडे मजबूत होतात आणि शरीराला कॅल्शियम आणि प्रथिने या दोन्ही पोषक तत्वांचा पुरवठा होतो. हे स्नायूंच्या बळकटीसाठी देखील मदत करतात आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.

मखान्यात बदाम आणि अक्रोड मिक्स करा
तुम्ही रोज सकाळी उठल्यावर हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता करण्यासाठी मखान्यात बदाम आणि आक्रोड नक्कीच मिसळा. या मिश्रणामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिने, ओमेगा-3 फॅट‍ी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात, ज्यामुळे मेंदू तीक्ष्ण होतो आणि हृदयही निरोगी राहते.

मखाना आणि चिया बियाणे
चिया बियांना सुपरफूड म्हटले जाते कारण त्यात प्रथिने, फायबर आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतात. जर तुम्ही चिया बियांमध्ये मखाने खाल्ले तर ते वजन कमी करण्यास मदत करते, पचन सुधारते आणि त्वचेची चमक वाढवते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button