ताज्या घडामोडीराष्ट्रिय

उबरवर ऑटो प्रवास स्वस्त होणार, फायदा ग्राहकांबरोबरच रिक्षा चालकांनाही

कंपनी रिक्षाचालकांसाठी सब्सक्रिप्शन बेस्ड मॉडेलकडे वळते

राष्ट्रीय : उबरने आपल्या प्लॅटफॉर्मवरील रिक्षा प्रवासाबाबत एक प्लॅन आखला आहे. यात तुम्हाला काहीसा दिलासा मिळू शकतो. विशेष म्हणजे रिक्षाचालकांकडून कोणतेही कमिशन घेतले जाणार नसून उबर त्यांना केवळ प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. बुकिंग रद्द करण्यासाठी उबर आता शुल्क आकारणार नाही. तर उबर फक्त भाडे सुचवेल, परंतु अंतिम रक्कम चालक आणि प्रवासी ठरवतील.

अ‍ॅपबेस्ड टॅक्सी सेवा उबर आता आपल्या प्लॅटफॉर्मवरील रिक्षा प्रवासात काही मोठे बदल करणार आहे. यामुळे ग्राहकांना रिक्षाप्रवास स्वस्त होऊ शकतो, तर रिक्षाचालकांनाही उत्पन्नाच्या दृष्टीने फायदा होऊ शकतो.

उबरने आपल्या प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या रिक्षाचालकांकडून कोणतेही कमिशन न घेण्याची योजना आखली आहे. त्याऐवजी आता रिक्षाचालकांना वर्गणी तत्त्वावर प्लॅटफॉर्म वापरण्याची मुभा मिळणार आहे. यामुळे रिक्षाचालकांना उत्पन्नात फायदा होण्याची शक्यता आहे.

पैसे रोखीनेच देणार
उबरने असेही स्पष्ट केले आहे की, जर युजर्सनी आपल्या प्लॅटफॉर्मवर ऑटोरिक्षा प्रवास बुक केला तर त्यांना केवळ रोख पेमेंटचा पर्याय मिळेल. दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू सारख्या शहरांमध्ये, जिथे उबर आपल्या प्लॅटफॉर्मवर ऑटोरिक्षा बुक करण्याचा पर्याय देते, तेथे रिक्षा चालक प्रवास रद्द करतात किंवा रोखीने पैसे देण्याची मागणी करतात. कदाचित याच कारणामुळे उबरने रिक्षा प्रवासासाठी हे मोठे निर्णय घेतले आहेत.

हेही वाचा –  हिंजवडी आयटी पार्कसह उद्योग क्षेत्राच्या वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पाऊल

रॅपिडोकडून कडवी स्पर्धा
उबरने रिक्षा प्रवासासाठी सब्सक्रिप्शन मॉडेलकडे जाण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे बाजारात रॅपिडोकडून मिळणारे आव्हान. रॅपिडोने नुकतीच बाइक टॅक्सीच्या पलीकडे आपल्या सेवेचा विस्तार केला आहे. आता आपल्या प्लॅटफॉर्मवर रिक्षा प्रवासाची सुविधा दिली जात असून, त्यासाठी वाहनचालकांकडून वर्गणी शुल्क आकारले जात आहे. बेंगळुरूच्या ‘नम्मा यात्री’ या रिक्षा बुकिंग सेवेनेही अशीच संकल्पना स्वीकारली आहे. त्यामुळे रिक्षाचालक या प्लॅटफॉर्मवर आगामी बुकिंगला प्राधान्य देत आहेत.

उबरने म्हटले आहे की, कंपनी रिक्षाचालकांसाठी सब्सक्रिप्शन बेस्ड मॉडेलकडे वळत आहे. इंडस्ट्रीचा हा ट्रेंड आहे आणि आम्हीही त्याच दिशेने वाटचाल करत आहोत. उबर आपल्या नवीन ऑटो मॉडेलसह एक मोठा बदल करत आहे, असे कंपनीने एका वेगळ्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. हा बदल SAAS (सॉफ्टवेअर-एज-ए-सर्व्हिस) कडे आहे. उबर तुम्हाला जवळच्या ड्रायव्हर्सशी कनेक्ट करेल, पण ही सेवा उबरपेक्षा वेगळी असेल.

रिक्षाचालकांकडून कोणतेही कमिशन घेतले जाणार नसून उबर त्यांना केवळ प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. बुकिंग रद्द करण्यासाठी उबर आता शुल्क आकारणार नाही. उबर फक्त भाडे सुचवेल, परंतु अंतिम रक्कम चालक आणि प्रवासी ठरवतील.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button