Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कॅप्टन शुबमन गिलची 269 धावांची ऐतिहासिक खेळी, विराट कोहलीचा महारेकॉर्ड ब्रेक

Shubman Gill : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल याने इंग्लंड दौऱ्यात इतिहास बदलला आहे. शुबमनने लीड्समध्ये कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी सामन्यात शानदार शतक ठोकलं. शुबमनने इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यातही हा तडाखा असाच कायम ठेवत ऐतिहासिक कामगिरी केली. शुबमनने धमाकेदार द्विशतक ठोकलं. त्यानंतर शुबमनने वेगाने पुढील 50 धावा केल्या. शुबमनने यासह 250 धावांचा टप्पा पार केला. त्यामुळे शुबमनला त्रिशतक करण्याची संधी होती. मात्र शुबमन त्रिशतक करण्यात अपयशी ठरला. शुबमनने एकूण 269 धावांची खेळी केली. शुबमनने यासह  भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याचा महारेकॉर्ड ब्रेक केला.

शुबमनने 387 बॉलमध्ये 69.51 च्या स्ट्राईक रेटने 30 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 269 रन्स केल्या. शुबमन यासह कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतासाठी एका डावात सर्वाधिक धावा करणारा पहिला कर्णधार ठरला. शुबमनने या खेळीदरम्यान 255 धावा पूर्ण करताच विराट कोहली याला मागे टाकलं. शुबमनने विराटचा कर्णधार म्हणून नाबाद 254 धावांचा विक्रम मोडीत काढला.

विराट कोहली याने 6 वर्षांपूर्वी त्याच्या कसोटी कारकीर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या केली होती. विराटने 2019 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुण्यात 336 बॉलमध्ये नॉट आऊट 254 रन्स केल्या होत्या.

हेही वाचा – जागतिकस्तरावर राज्यातील पर्यटन उद्योगाला पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टुर स्पर्धेच्या माध्यमातून चालना मिळणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शुबमनने द्विशतकासह असंख्य विक्रम स्वत:च्या नावावर केले. शुबमनने भारताकडून इंग्लंडमध्ये द्विशतक करणारा पहिला कर्णधार होण्याचा बहुमान मिळवला. शुबमनआधी एकाही भारतीय कर्णधाराला अशी कामगिरी करता आली नव्हती. तसेच भारतासाठी कर्णधार म्हणून कसोटीत 6 वर्षांनंतर हे पहिलं द्विशतक ठरलं.

दरम्यान शुबमनने केलेल्या या 269 धावांच्या खेळीमुळे भारताला पहिल्या डावात 580 पार धडक देता आली. टीम इंडियाकडून शुबमन व्यतिरिक्त यशस्वी जैस्वाल आणि रवींद्र जडेजा या दोघांनी उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र दोघांचीही शतकाची संधी हुकली.

यशस्वीने 107 बॉलमध्ये 13 फोरसह 87 रन्स केल्या. तर ऑलराउंडर जडेजाने 137 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकारसह 64.96 च्या स्ट्राईक रेटने 89 धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदर यानेही संयमी पण तडाखेदार खेळी केली. वॉशिंग्टनने 42 धावांची खेळी केली.  भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. त्यानंतर आता भारतीय गोलंदाजांसमोर सर्व मदार असणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button