ताज्या घडामोडीपुणे

रात्री फळे खाणे खरोखरच हानिकारक आहे का ?

फळांमध्ये असलेले जीवनसत्वे आणि खनिजे यासर्व प्रकारच्या अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्त्रोत

पुणे : तंदुरस्त आरोग्यासाठी आपण आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करत असतो. त्यात दिवसभरात फळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मते, तुमच्या आहारात एक फळ नक्कीच समाविष्ट करायला हवे. रंगीबेरंगी फळे चवीला खुप चांगले असतात आणि त्यात पोषक तत्वांचा खजिना देखील भरपूर असतो. ऋतूनुसार वेगवेगळी हंगामी फळे बाजारात येत असतात, ती दररोज खाल्ल्याने तुम्ही अनेक आजारांपासून स्वतःला दूर ठेवू शकता. टरबूज, केळी, चिकु, नासपती इत्यादी फळे सकाळी खाऊ शकतात कारण या फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे सकाळी तुमची पचनशक्ती वाढते. टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे दिवसा ही फळे खाल्ल्याने तुम्ही दिवसभर हायड्रेटेड राहता.

फळांचे सेवन केल्याने तुमचे एकूण आरोग्य संतुलित राखण्यास मदत होते, कारण ते शरीरातील पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करण्याचे काम करतात. पण दिवसा फळे खाण्याने मिळणारे फायदे रात्री फळे खाल्ल्याने आरोग्यासाठी तेवढेच फायदेशीर आहे का? असे अनेक प्रश्न पडतात. अशातच रात्री फळे खाणे खरोखरच हानिकारक आहे का ते आपण आजच्या या लेखातुन जाणून घेऊयात…

हेही वाचा –  शिवरायांना महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका; अमित शहा यांचे जनतेला आवाहन

वजन वाढू शकते
शक्य असल्यास रात्री फळे खाणे टाळा कारण ते पचण्यास वेळ लागतो आणि त्यामुळे गॅस किंवा अपचन सारख्या समस्या उद्भवू शकतात. संध्याकाळनंतर आपल्या शरीरातील चयापचय मंदावू लागते, त्यामुळे फळांमध्ये असलेले पोषक घटक योग्यरित्या पचत नाहीत. त्यामुळे फळे खाण्याचा पूर्ण फायदा होत नाही आणि फळांमध्येही नैसर्गिक साखर भरपूर असते. जेव्हा आपण रात्री जेवतो तेव्हा त्यानंतर आपण कोणतीही शारीरिक हालचाल करू शकत नाही, ज्यामुळे वजन वाढू शकते.

फळे खाल्ल्याने झोपेवर होणारा परिणाम
रात्री झोपण्यापूर्वी काही तास आधी फळे खाल्ल्याने झोपेचा त्रास होऊ शकतो. जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी भरपूर फळे खाल्ली आणि नंतर लगेच जेवण केले तर तुम्हाला जड वाटू शकते. गॅसची समस्या देखील होऊ शकते.

वारंवार लघवी होण्याची समस्या
फळांमध्ये भरपूर पाणी असते, म्हणून तुम्ही विशेषतः रात्रीच्या वेळी रसाळ फळे खाणे टाळावे, अन्यथा तुम्हाला जास्त लघवी होण्याची समस्या उद्भवू शकते. यामुळे तुमची झोप बिघडते आणि तुम्हाला वारंवार वॉशरूममध्ये जावे लागू शकते.

रक्तातील साखर वाढू शकते
बहुतेक फळांमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. जेवणाच्या वेळी फळे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते, म्हणून झोपण्यापूर्वी फळे खाणे टाळावे. मधुमेह असलेल्या लोकांनी याची अधिक काळजी घ्यावी.

फळे खाण्याची योग्य वेळ कोणती?
फळे खाण्याची योग्य वेळ म्हणजे नाश्ता केल्यानंतर. नाश्ता केल्यानंतर दुपारी 1:00 वाजेपर्यंत तुम्ही कोणतेही फळ खाऊ शकता. यामुळे तुमच्या आरोग्याला योग्य प्रमाणात भरपूर पोषक तत्वे देखील मिळतील. आयुर्वेदानुसार, सकाळी रिकाम्या पोटी पपई आणि केळी खाल्ल्याने पोट स्वच्छ राहते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button