शिवरायांना महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका; अमित शहा यांचे जनतेला आवाहन

Amit Shah : स्व-धर्माचा अभिमान, स्व-राज्याची आकांक्षा आणि स्व-भाषेला अमर करणं हे विचार देशाच्या सीमेपुरते मर्यादित असू शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना माझी हात जोडून विनंती आहे. शिवरायांना महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका, छत्रपती शिवाजी महाराजांकडून देशच काय जग प्रेरणा घेऊ शकते, असे आवाहन केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी रायगडावरुन केले.
रायगडावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात अमित शहा उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेही उपस्थित होते. यावेळी अमित शहा यांना शिंदेशाही पगडी आणि कवड्यांची माळ भेट म्हणून देण्यात आली. भाषणाच्या सुरुवातील त्यांनी जिजाऊंना अभिवादन केले. ते म्हणाले, मी शिवचरित्र वाचले आहे. जिजाऊंनी शिवरायांना केवळ जन्मच दिला नाही तर स्वराज्याची प्रेरणा दिली. एका बाल शिवाला देशाला स्वतंत्र करण्याचा विचार जिजाऊंनी दिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बनवण्याचा विचारही जिजाऊंनी दिला. रायगडावर उभा असताना शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला नमस्कार करताना माझ्या मनात दाटून आलेल्या भावना मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.
हेही वाचा – महात्मा फुले स्मारकासाठी जागा संपादन प्रक्रियेला गती; कार्यवाहीसाठी विशेष उपायुक्त नेमण्याचा निर्णय
शिवरायांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा देश अंध:कारात बुडाला होता. अशावेळी कोणाच्याही मनात स्वराज्याची कल्पना येणे अशक्य होते. कारण तेव्हा परिस्थितीच तशी होती. मात्र तरीही एक 12 वर्षांचा मुलगा जिजाऊंच्या प्रेरणेने प्रतिज्ञा घेवून सिंधू ते कन्याकुमारीपर्यंत भगवा फडकवण्याची प्रतिज्ञा करतो, हे अद्भूत आहे, असेही ते यावेळी म्हणाले. मी आजपर्यंत जगातील अनेक नायकांचे चरित्र वाचले आहेत. मात्र अशी दृढ इच्छाशक्ती, दुर्दम्य साहस, रणनीती आणि ती रणनीती पूर्ण करण्यासाठी समाजातील प्रत्येक वर्गाला एकत्र जोडून कधीही पराभव न होणाऱ्या सैन्याची निर्मिती करणं शिवरायांशिवाय कोणीच करू शकलेले नाही.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत एक कायदा करण्यात यावा, जो नॉन बेलेबल असावा. १० वर्षे बेल मिळाली नाही पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा. जेणेकरून कुठल्याही प्रकारची सामाजिक तेढ निर्माण होऊ नये. तसेच सिनेमॅटिक लिबर्टीच्या संदर्भात एक सेंन्सर बोर्ड स्थापन करण्यात यावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा