Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

२ कोटी १७ लाख रुपये किमतीच्या औषध व वैद्यकीय साहित्य साठ्यावर कारवाई

वैद्यकीय उपकरणे नियम २०१७ अंतर्गत मुंबई, ठाणे व पालघर येथे एफडीएचे छापे

मुंबई | भिवंडी, पालघर आणि मुंबई येथील तीन आस्थापनांमधून एकूण ८१ लक्ष किमतीचा औषध साठा जप्त करण्यात आला असून १ कोटी ३५ लाख रुपये किमतीचा सर्जिकल ग्लोव्हज साठा गुणवत्ता चाचणीसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार तपासणी मोहीम कारवाईत औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० आणि नियमांचा भंग करणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA)तपास पथकाने मे.साची मेडिक, साकीनाका या आस्थापनावर टाकलेल्या छाप्यात परवाने व नोंदणी नसलेल्या व्यावसायिकाने मलेशिया (Malaysia) येथून विना निर्जंतुकीकरण सर्जिकल ग्लोव्हजची आयात करून कोणत्याही परवान्याशिवाय साठवणूक व विक्री केल्याचे उघड झाले. आयात केलेले ग्लोव्हजची वाडा व भिवंडी येथील वैद्यकीय उपकरणे उत्पादन परवाने असलेल्या व्यावसायास पँकिग व लेबलीग करून पुढे त्याची विक्री करण्यास पुरवठा केला असल्याचे आढळून आले. या कारवाईत ७४.८५ रुपये किमतीचे ‘विना निर्जंतुकीकरण सर्जिकल ग्लोव्हज’ (Non-Sterile Surgical Gloves) जप्त करण्यात आले. कागदपत्रांनुसार या पेढीने मुंबई महानगरपालिका रुग्णालयांना पुरवठा/ विक्री केल्याचे आढळून आले आहे.

मे.साची मेडिक या संस्थेच्या भिवंडीतील वैद्यकीय उपकरण उत्पादक आस्थापनावर कारवाई करण्यात आली. तथापि तपासणीदरम्यान तेथे ‘वैद्यकीय उपकरणे नियम २०१७’ च्या तरतुदींचा गंभीर भंग झाल्याचे आढळून आले. जनस्वास्थाच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने ९.८८ लक्ष रुपयांचा ग्लोव्हजचा साठा प्रतिबंधित केला असून कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा

आशिया चषक हॉकी: भारतीय कुमार संघाने रचला इतिहास; जपानचा ४-१ ने धुव्वा उडवत तिसऱ्यांदा जिंकले जेतेपद

पालघर जिल्ह्यातील वाडा येथील मेडिअर्थ लाईफकेअर आस्थापनावर टाकलेल्या छाप्यात उघडकीस आला, तिथे निर्जंतुकीकरण (Sterilization) व इतर उपकरणे नादुरुस्त आहेत, अशा स्थितीत ‘विना निर्जंतुकीकरण सर्जिकल ग्लोव्हज’ (Non-Sterile Surgical Gloves) खरेदी करून त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते निर्जंतुक असल्याचे भासवून शासकिय रुग्णालयांना वैद्यकीय महाविद्यालयांना पुरवठा करण्यात आल्याची माहिती आस्थापना मालकाने दिली आहे. या मोहिमेत कोट्यावधीचे विना निर्जंतुकीकरण सर्जिकल ग्लोव्हज (Surgical Gloves) वर निर्जंतुक लेबल करून शासकीय वैद्यकीय रुग्णालयांना महाविद्यालयांना देखील पुरवठा करण्यात आल्याचा गैरप्रकार गंभीर आहे. प्रशासनाने १.२६ कोटी किमतीचा विना निर्जंतुकीकरण बँडेज, रोल बँडेज व कॉटन गौज साठा विक्री व वितरणासाठी प्रतिबंधित केला आहे. तसेच वैध परवाना नसताना बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेला अॅलोपॅथिक औषधांचा ६.१७ लक्ष किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून, हस्तगत केलेल्या अभिलेख्याची पडताळणी सुरु आहे.

वैद्यकीय व्यावसायिक व रुग्णालयांना अन्न व औषध प्रशासनचे आवाहन

सर्व डॉक्टर, रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि वैद्यकीय व्यावसायिकांना आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (FDA) यांनी औषधे, सर्जिकल ग्लोव्हज (Surgical Gloves) किंवा अन्य कोणतीही वैद्यकीय उपकरणे खरेदी करताना ती केवळ परवानाधारक आणि अधिकृत उत्पादक/पुरवठादाराकडूनच खरेदी करावीत, असे आवाहन केले आहे. सदर उत्पादनांचा वापर मोठ्या प्रमाणावर रुग्णालयात होत असतो त्यामुळे पुरवठा करण्यात आलेल्या खात्रीशीर गुणवत्ता नसलेल्या उत्पादनांच्या वापरामुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होतो. वैद्यकीय उपकरणे किंवा औषधे खरेदी करताना त्यावर परवाना क्रमांक (License Number), बॅच नंबर, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट व्यवस्थित छापलेली आहे की नाही याची खात्री करावी. शस्त्रक्रिया किंवा तपासणीसाठी वापरले जाणारे ग्लोव्हज Medical Devices Rules 2017 च्या मानकाप्रमाणे आहेत की नाही हे तपासावे. पॅकिंग फाटलेले असल्यास ते वापरणे टाळावे, असे आवाहन केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button