शुक्र राशीच्या जातकांना फळ, त्या 3 राशी कोणत्या आहेत? हे जाणून घेऊयात.
शुक्र ग्रहाचा मुक्काम मेष राशीत महिनाभरापेक्षा अधिक काळ , शुक्र ग्रहाची स्थिती प्रत्येक राशीत वेगवेगळी

पुणे : ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह अनेक गोष्टींचं प्रतिक आहे. शुक्र ग्रह सुख, प्रेम, आकर्षण आणि संपत्तीचा कारक मानला जातो. त्यामुळे शुक्र ग्रहाच्य प्रत्येक हालचालीचा परिणाम होत असतो. शुक्राच्या राशीतील बदलाचा या सर्व क्षेत्रांवर मोठा परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र सध्या मीन राशीत आहे. मात्र काही दिवसांनी शुक्र आपली राशी बदलणार आहे. शुक्र ग्रह 31 मे रोजी सकाळी 11 वाजून 42 मिनिटांनी मेष राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहाचा मुक्काम मेष राशीत महिनाभरापेक्षा अधिक काळ असणार आहे, शुक्र 29 जूनपर्यंत मेष राशीत असणार आहे. शुक्र ग्रहाची स्थिती प्रत्येक राशीत वेगवेगळी आहे. त्यामुळे या स्थितीनुसार शुक्र या राशीच्या जातकांना फळ मिळणार आहे. त्या 3 राशी कोणत्या आहेत? हे जाणून घेऊयात.
मिथून राशी
शुक्र ग्रह मिथुन राशीच्या अकराव्या स्थानी असणार आहे. अकरावं स्थान हे इच्छा आणि पूर्तीचं प्रतिक आहे. त्यामुळे मिथून राशीच्या लोकांना सर्व क्षेत्रात फायदा मिळू शकतो. अपत्य प्राप्ती आणि संबधित गोड बातमी मिळू शकते. नवी नोकरी मिळण्याची आणि विदेशात जाण्याची संधी मिळू शकते. व्यावयासात तगडा फायदा होऊ शकतो. गुंतवणुकदारांना फायदा होण्याची अधिक शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारु शकते. आरोग्य चांगले राहिल.
हेही वाचा – शिवरायांना महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका; अमित शहा यांचे जनतेला आवाहन
सिंह राशी
शुक्र ग्रह सिंह राशीच्या दहाव्या स्थानी अर्थात कर्म स्थानी असणार आहे. शुक्र ग्रहाच्या हालचालीमुळे सिंह राशीच्या लोकांची करिअर आणि व्यावसायामध्ये प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी प्रमोशन किंवा नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना नवीन ऑर्डर आणि नफा मिळण्याची अधिक शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा आणि प्रभाव वाढेल. जोडीदारासोबतचं नाते अधिक दृढ होईल.
कुंभ राशी
शुक्र ग्रह कुंभ राशीच्या तिसऱ्या स्थानी असणार आहे, जे साहस, प्रयत्न आणि पराक्रमाशी संबंधित आहे. शुक्र ग्रहाच्या हालचालीचा कुंभ राशीला काय फायदा होईल? हे जाणून घेऊयात. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ यशकारक असेल. कुंभ राशीच्या लोकांची अनेक काळापासून रखडलेली काम मार्गी लागतील. संपत्तीत वाढ होण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवनात गोडवा वाढेल. नवीन नोकरीची संधी मिळू शकते.