ताज्या घडामोडीपुणे

घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी टिकून राहावी यासाठी तुम्ही वास्तूच्या नियमांचे पालन करणे गरजेचे

या वस्तूंमुळे तुमच्या घरातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात आणि तण तणावाचे वातावरण निर्माण होते.

पुणे : आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदावी असे सर्वांना वाटते. तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी टिकून राहावी यासाठी तुम्ही वास्तूच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. वास्तूशास्त्रामध्ये अनेक नियम सांगितले आहे ज्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. अनेक लोकांना घरामध्ये सजावटीसाठी नविन वस्तू घेऊन येण्याची सवय असते. परंतु तुम्हाला माहिती आहे का काही वस्तू तुमच्या घरातील वातावरण नकारात्मक करू शकतात. या वस्तूंमुळे तुमच्या घरातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात आणि तण तणावाचे वातावरण निर्माण होते. अशा परिस्थितीमध्ये चला जाणून घेऊया घरात अशा दुसऱ्यांचा कोणत्या वस्तू घेऊन येऊ नये.

आपण अनेक वेळा बघतो की मंदिरामध्ये जास्त गर्दी असेल किंवा कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी लोकं बऱ्याचवेळा दुसऱ्यांची चप्पल आणि बूट घालतात. परंतु, वास्त्रुशास्त्राच्या नियमानुसार असे केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक समस्या योऊ शकतात असे केल्यामुळे तुमची महत्त्वाची कामे लांबणीवर जाऊ शकतात ज्यामुळे तुमची प्रगती थांबते. ज्या लोकांचे बूट किंवा चप्पल तुम्ही घालता त्या व्यक्तीच्या आयुष्यातील नकारात्मकता तुमच्या आयुष्यावर परिणाम करू शकतात. त्यामुळे दुसऱ्यांची चप्पल कधीच वापरू नका.

हेही वाचा –  बोल्हेगावातील दारूअड्डे पोलिसांनी केले उद्ध्वस्त

दुसऱ्या लोकांच्या घरातील फर्निचरही तुमच्या घरात आणू नये. वास्तूशास्त्राच्या मान्यतेनुसार, दुसऱ्यांच्या घराचील फर्निचर तुमच्या घरात आणल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक उर्जा वाढू शकते, त्यासोबतच या गोष्टीमुळे तुमच्या घरातील सदस्यांमध्ये भांडण होऊ शकते. दुसऱ्यांच्या घरातील फर्निचर आणल्यामुळे तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. बऱ्याच वेळा, गरज पडल्यास, आपण इतरांकडून छत्री मागतो. दुसऱ्यांकडून छत्री मागणे आपल्याला सामान्य वाटेल. परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून दुसऱ्यांची छत्री वापरणे अजिबात योग्य मानले जात नाही. यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून, इतरांच्या छत्र्या त्यांना लवकरात लवकर परत कराव्यात. वास्तुशास्त्रात असेही मानले जाते की कधीही दुसऱ्याच्या घरातून गॅस स्टोव्ह किंवा स्टोव्ह मागू नये. असे केल्याने कुटुंबाचे आशीर्वाद थांबू शकतात. यासोबतच, तुम्ही कधीही दुसऱ्याकडून आलेल्या लोखंडी वस्तू तुमच्या घरी आणू नयेत. असे मानले जाते की जेव्हा तुम्ही एखाद्याकडून लोखंडी वस्तू आणता तेव्हा शनिदेवही त्यासोबत घरात येतात. त्यामुळे घरात अनेक समस्या वाढू लागतात.

‘या’ सोप्या ट्रिक्स करा फॉलो….
घरातील सकारात्मक उर्जा वाढवण्यासाठी तुम्ही सध्याकाळी तुमच्या घरातील मंदिरासमोर दिवा लावा.

तुमच्या घराच्या मुख्यद्वारा जवळ तूपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते.

घरामधील खोल्या स्वच्छ आणि सुटसुटीत असले पाहिजेल ज्यामुळे तुमच्या घरातील उर्जा हसत खेळत राहाते.

घरातून बाहेर जाताना देवाचे तुमच्या पूर्वजांचे आणि आई वडिलांचे आशिर्वाद घेतल्यामुळे तुमची कामामध्ये प्रगती होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button