बोल्हेगावातील दारूअड्डे पोलिसांनी केले उद्ध्वस्त

नगर: बोल्हेगाव, गांधीनगर परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यांवर शनिवारी तोफखाना पोलिसांनी थेट जेसीबीच्या सह्याने कारवाई करीत उद्ध्वस्त केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
बोल्हेगाव रस्ता, भरत बेकरी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अतिक्रमण करून अवैध धंद्दे चालविले जात होते. त्यातून अनेक गुन्हेही घडत होते. याबाबत काही दिवसांपूर्वी महिलांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले होते. याची दखल घेत तोफखाना पोलिसांनी खात्री केली. शनिवारी सायंकाळी पोलिस जेसीबीसह बोल्हेगावात पोचले.
हेही वाचा – ‘एसआरए अंतर्गत ४५० स्क्वेअर फुटांची सदनिका मिळावी’; केंद्रीय मंत्री रामदास आठवले
रस्त्याच्या कडेला हिरव्या कापडाच्या आडोशाला आणि टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या दारू अड्ड्यांवर छापा घालून कारवाई केली. त्या दारू अड्ड्यावर नुसती कारवाईच नाही तर थेट जेसीबीच्या सह्याने कच्चे बांधकामही पाडून टाकले. तर, पत्र्याच्या टपर्या मोडून टाकल्या. त्यामुळ बोल्हेगावच्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. ही कारवाई पोलिस निरीक्षक आनंद कोकरे, सहायक पोलिस निरीक्षक कल्पना चव्हाण, उपनिरीक्षक विजय रणशिवरे यांच्या पथकाने केली.