काही दिवसातच प्रयागराज येथील कुंभमेळ्याचा समारोप
काही लोक संगमच्या पवित्र पाण्यात डुबकी घेऊन पाप धुताना दिसले, तर काही लोक आपापल्या सामर्थ्यानुसार वस्तू पाण्यात प्रवाहित करताना दिसले.

उत्तराखंड : आता काही दिवसातच प्रयागराज येथील कुंभमेळ्याचा समारोप होणार आहे. जगातील या सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमात करोडो लोकांनी आस्थेची डुबकी घेतली. देश-विदेशातील अनेक लोकांनी संगम येथे येऊन आपले पाप धुतले. हिंदू धर्मात पाप धुवायला अनेक मार्ग आहेत. काही लोक संगमच्या पवित्र पाण्यात डुबकी घेऊन पाप धुताना दिसले, तर काही लोक आपापल्या सामर्थ्यानुसार वस्तू पाण्यात प्रवाहित करताना दिसले.
तुम्ही संगमच्या पाण्यात नारळ, फुलं, धूपबत्ती आणि इतर पूजेचे साहित्य तरंगत असताना पाहिलं असेल. या पूजा साहित्याला पाण्यात सोडून लोक आपल्या पापाचं प्रायश्चित करत होते. पण पाण्यात तरंगणाऱ्या या पूजा साहित्यावर गिधाडा सारखी नजर ठेवून असलेलेही काही लोक होते. जेव्हा भाविक भक्तीभावाने पाण्यात हे साहित्य प्रवाहित करत होते, तेव्हा काही लोक हे साहित्य लुटण्यासाठी एकच झेप घेत होते. नारळ, पैसे आणि फळं खायला मिळावीत म्हणून लोकांच्या एकच झुंबड उडत होती. सोशल मीडियावर अनेक लोकांनी आपल्याशी संबंधित अशी लूट होण्याचे व्हिडिओ शेअर केले आहेत. हे पाहून तुम्ही देखील चकित व्हाल.
हातोहात सामान पळवलं
काही लोक तर पाण्यात सोडून दिलेलं हेच पूजेचं साहित्य मिळवून पुन्हा त्याची विक्री करतानाही दिसत होते. नारळ, दुपट्टा आणि खण पाण्यात सोडून दिले जात होते. तर काही लोक भाविकांनी सोडलेल्या या वस्तू पुन्हा जमा करून त्या दुकानात विकताना दिसत होते. काही ठिकाणी तर दुकानदारच स्वतःची मुलं आणि महिलांना या कामावर ठेवतानाही दिसले. सुरुवातीला हे लोक भक्तांकडून प्रवाहित केलेलं साहित्य जमा करत होते, पण महाकुंभाचा समापन जवळ आल्यावर आता लोकांच्या हातूनच सामान छीनले जात असल्याचंही दिसत आहे.
हेही वाचा – बोल्हेगावातील दारूअड्डे पोलिसांनी केले उद्ध्वस्त
अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एक महिलाही आपले पाप गंगेत सोडून देण्यासाठी आली होती. तिने एका ताटात पूजेचं सर्व साहित्य घेतलं होतं. नारळ होतं, फळे होती, चुनरी होती आणि इतर पूजा साहित्य होतं. ही महिला गंगेच्या पाण्यात गेली. उभी राहिली आणि जशी ती पूजा साहित्य पाण्यात सोडायला गेली, तसं त्या सामानावर लहान मुलांचं एक टोळकं तुटून पडलं. पूजाचं साहित्य पाण्यात सोडलंही नव्हतं तेच मुलांनी तिच्या हातावर हात मारला आणि संपूर्ण साहित्य हिसकावलं. हे पाहून महिला आश्चर्यचकित झाली आणि तिच्या चेहऱ्यावर हताशतेचे भाव स्पष्टपणे दिसून आले. पाप धुवायला आली आणि पापच चोरीला गेले, असेच तिच्या चेहऱ्यावरचे भाव होते. असे अनेक प्रकार संगमच्या पाण्यात स्नान करत असलेल्या लोकांसोबत घडत आहेत, असं सांगितलं जातं.