राजकीय भूकंप! ‘या’ शिलेदाराचा शिवसेना ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

मुंबई : शिवसेना पक्षाचा उद्या १९ जून रोजी वर्धापन दिन आहे. यानिमित्त अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते शिशिर शिंदे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे उपनेतेपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.
शिशिर शिंदे यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे. पक्षाच्या उपनेते पदाचा राजीनामा देताच त्यांनी एक पत्र लिहलं आहे. यामध्ये त्यांनी राजीनामा देण्यामागची सविस्तर भूमिका मांडली आहे. पक्षात काम करण्याची संधी मिळत नाही. पक्षात घुसमट होत असल्याचं शिशिर शिंदे यांनी पत्रात म्हटलं आहे.
हेही वाचा – माजी क्रिकेटर अंबाती रायडूची राजकारणात एन्ट्री? ‘या’ पक्षात करणार प्रवेश?
शिशिर शिंदे यांची थोडक्यात राजकीय कारकिर्द
आधी शिवसेना मग मनसे आन् पुन्हा शिवसेना असा त्यांचा अत्तापर्यंतचा प्रवास आहे. २०१८ ला त्यांनी महाराष्ट्र नवनिर्मान सेनेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत घरवापसी केली होती. त्यानंतर त्यांना राजकीय पुनर्वसनासाठी चार वर्षे वाट पाहावी लागली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिशिर शिंदे यांची उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली होती.
२००९ ला भाडूंप विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २०१४ ला निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.




